Home | Jeevan Mantra | Dharm | Janmashtami On 3 September Measures Of Krishna

खराब भाग्यही उजळू शकते या 5 उपायांनी, 3 सप्टेंबरला अवश्य करा

रिलिजन डेस्क | Update - Aug 31, 2018, 12:34 PM IST

प्रत्येक वर्षी भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव श्रावण मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो.

 • Janmashtami On 3 September Measures Of Krishna

  प्रत्येक वर्षी भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव श्रावण मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. यावेळी हा उत्सव 3 सप्टेंबरला सोमवारी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार हा दिवस भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करण्यासाठी सर्वात उत्तम आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास व्यक्तीचा वाईट काळ दूर होऊ शकतो. नशिबाची साथ मिळते. जन्माष्टमीच्या दिवशी येथे सांगण्यात आलेले उपाय करू शकता...


  1. तुळशीची पूजा करावी
  भगवान श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये तुळशीचे विशेष महत्त्व आहे. यामुळे जन्माष्टमीला तुळशीजवळ गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि ऊं वासुदेवाय नम: मंत्राचा उच्चार करत 11 प्रदक्षिणा घालाव्यात. या उपायाने घरामध्ये सुख-शांती राहील. कोणत्याही प्रकारचे संकट घरावर येणार नाही.


  2. खीर नैवेद्य दाखवावी
  तुम्हाला पैसा हवा असल्यास जन्माष्टमीच्या दिवशी एखाद्या कृष्ण मंदिरात जाऊन खीर नैवेद्य दाखवावी. खिरमध्ये तुळशीचे पाने अवश्य टाकावीत. यामुळे भगवान श्रीकृष्ण लवकर प्रसन्न होतात.


  3. गरजू लोकांची मदत करा
  भगवान श्रीकृष्णाला पितांबरधारी म्हणतात, याचा अर्थ पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करणारे. जन्माष्टमीला पिवळ्या रंगाचे कपडे, पिवळे फळ, धान्य श्रीकृष्णाला अर्पण करावे आणि नंतर या सर्व गोष्टी गरिबांना दान कराव्यात.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

 • Janmashtami On 3 September Measures Of Krishna

  4. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे
  तुम्ही कर्जाने त्रस्त असाल तर जन्माष्टमीच्या दिवशी एखाद्या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. पिंपळाच्या झाडामध्ये श्रीविष्णूंचा वास मानण्यात आला आहे. या उपायाने तुम्ही लवकर कर्जमुक्त होऊ शकता.

 • Janmashtami On 3 September Measures Of Krishna

  5. मंत्र जप करावा
  धन प्राप्तीची इच्छा असलेल्या लोकांनी जन्माष्टमीला खालील मंत्राचा 5 माळ जप करावा.
  मंत्र -ऊं ह्रीं ऐं क्लीं श्री:

Trending