आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा कचेरीसमोर प्रहार जनशक्तीतर्फे बेशरम आंदोलन...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली -सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून देणे, स्मशानभूमीचे काम चालू करावे या विविध मागण्यासाठी  प्रहारतर्फे जिल्हा कचेरीसमोर सोमवारी बेशरम आंदोलन करण्यात आले. या वेळी जयपूर ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणल्याचे चित्र होते. 


यापूर्वी देखील जयपूर ग्रामस्थांनी याच मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन केले होते. मात्र लेखी आश्वासन देऊन दोन महिन्यांत काम केले जाणार असे सांगितले होते. परंतु दोन महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप कामे केली नसल्यामुळे पुन्हा मुंबई येथे १७ नोव्हेंबर १८ रोजी अाझाद मैदानावर आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. तरी देखील कामे सुरू केली नाहीत. त्यामुळे पुन्हा १४ जानेवारीपासून बेशरम आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले जात  आहे. या वेळी पाणी द्या असे म्हणत संतप्त गावकऱ्यांनी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. या वेळी संदीप पायघन, सचिन पायघन,  यांच्यासह  कार्यकर्ते उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...