आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • January 2019 Hindu Panchang Importance Date And Tithi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन महिन्यात कोणत्या दिवशी कोणती विशेष तिथी आणि सण राहील, वाचा संपूर्ण लिस्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 हिंदू पंचांगानुसार, जानेवारी 2019 मध्ये विविध विशेष तिथी आणि खास सण येत आहेत. या महिन्यात तीन एकादशी असतील. हा एक दुर्लभ संयोग आहे, कारण सामन्यतः एका महिन्यात 2 एकादशी येतात. या व्यतिरिक्त जानेवारीमध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणही राहील. मान्यतेनुसार जे लोक विशेष तिथीला व्रत-उपवास करतात त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी नष्ट होतात. येथे जाणून घ्या, 2019 मध्ये कोणत्या दिवशी कोणती तिथी येत आहे...


1 जानेवारी : सफला एकादशी. या दिवशी भगवान विष्णूंची व्रत-उपवास केले जाते.


5 जानेवारी : मार्गशीर्ष अमावस्या. या दिवशी श्राद्ध कर्म करावे.


6 जानेवारी : आंशिक सूर्यग्रहण. या दिवशी ग्रहणानंतर स्नान आणि दान करावे.


10 जानेवारी : गुरुवार - विनायक चतुर्थी आहे. या दिवशी श्रीगणेशाची विशेष पूजा करावी.


13 जानेवारी : भानु सप्तमी आहे. या तिथीला सूर्यदेवाची विशेष पूजा करावी.


14 जानेवारी : या दिवशी लोहडी. हा सण विशेषतः पंजाबमध्ये उत्साहाने साजरा केला जातो.


15 जानेवारी : उत्तरायण आणि मकरसंक्रांती. या दिवशी सूर्यदेवासाठी दान-पुण्य करावे.


17 जानेवारी : या दिवशी पुत्रदा एकादशी आहे. भगवान विष्णूंची विशेष पूजा करावी.


21 जानेवारी : पौष पौर्णिमा आणि चंद्रग्रहणही आहे. या दिवशी स्नान आणि दान करावे.


24 जानेवारी : संकष्टी चतुर्थी व्रत. या दिवशी श्रीगणेशाची विशेष पूजा करावी.


31 जानेवारी : षटतिला एकादशी. या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा करावी