आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • January 2020 Is The Highest Grossing Month Of The Decade, But Only One Film Is Successful Out Of The 30

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दशकातील सर्वात जास्त कमावणारा महिना जानेवारी 2020, पण 30 चित्रपटांपैकी जास्त यशस्वी केवळ एकच

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 2020 चा पहिला महिना म्हणजेच जानेवारी संपला आहे. कमाईच्या दृष्टीने हा महिना हिंदी बॉक्स ऑफिससाठी एका दशकातील सर्वात जास्त यशस्वी जानेवारी राहिला आहे. पण यशस्वी चित्रपटांच्या संख्येने निराश केले. मागच्यावर्षीप्रमाणेच यावेळीही जानेवारी केवळ एक चित्रपट 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' च यश मिळवू शकली. तर 30 पेक्षा जास्त चित्रपट रिलीज झाले. 

31 जानेवारीपर्यंत 386 कोटींचे कलेक्शन... 

31 जानेवारीपर्यँत सर्व चित्रपटांचे एकूण कलेक्शन सुमारे 386 रुपये राहिले. खास गोष्ट ही आहे की, यामध्ये 240.64 कोटी रुपये केवळ अजय देवगण स्टारर 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' ने केली. तर इतर चित्रपटांनी केवळ 145.36 कोटी रुपयेच कमवले. यामध्ये 'स्ट्रीट डांसर 3डी' (56.77 कोटी रुपये), 'पंगा' (21.36 कोटी रुपये) आणि 'छपाक' (34.03 कोटी रुपये) हे चित्रपट सोडले तर कोणत्याही चित्रपटाने 10 कोटी रुपयांचे कलेक्शनदेखील केले नाही. 14 चित्रपटांचे कलेक्शन 1 कोटींपेक्षा कमी राहिले.  


400 कोटी रुपयांच्या पार असेल एकूण कलेक्शन.
.. 

जानेवारीचा शेवटचा शुक्रवार 31 तारीखेला झाला. यादिवशी बॉक्स ऑफिसवेबर सैफ अली खान स्टारर 'जवानी जानेमन', हिमेश रेशमिया स्टारर 'हॅप्पी हार्डी अँड हीर' आणि हॉलीवूडचा 'बॅड बॉईज फॉर लाइफ' सह सुमारे 6 चित्रपट रिलीज झाले आहेत. पण यापैकी एकालाही समाधानकारक ओपनिंग मिळाली नाही.  यांच्या लाइफटाइम कलेक्शनबद्दल चित्रपट डिस्ट्रीब्यूटर, ट्रेड एक्सपर्ट आणि मल्टीप्लेक्स मालक राज बंसल म्हणाले, 'जवानी जानेमन' ने सुमारे 3 कोटी रुपयांनी ओपनिंग केली आहे आणि मॅक्सिमम 15-16 कोटींपर्यंतचे लाइफटाइम कलेक्शन करेल. तसेच 'हॅप्पी हार्डी एंड हीर'ने पहिल्या दिवशी 50 लाख रुपयांची कमाई केली आणि याचे लाइफटाइम कलेक्शन 2.50 कोटींपेक्षा जास्त जाण्याची अपेक्षा नाहीये. 'बॅड बॉईज फॉर लाइफ' ला 1.25-1.50 कोटींची ओपनिंग मिळाली. पण याची माउथ पब्लिसिटी चांगली आहे. त्यामुळे याच्या कमाईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याच्या लाइफटाइम कलेक्शनबद्दल आता अंदाज लावणे योग्य ठरणार नाही. 

जर हे आकडे सामील केले तर जानेवारीमध्ये बॉक्स ऑफिसची एकूण कमाई 400 कोटींच्या पार जाताना दिसते.  

हे 14 चित्रपट 1 कोटीदेखील कमावू शकले नाही. 

क्र.चित्रपट रिलीज डेटबॉक्स ऑफिस कलेक्शन
1शहीद चंद्रशेखर आजाद24 जानेवारी30 हजार रुपये
2जस्ट मर्सी (हॉलीवूड)17 जानेवारी19 लाख रुपये
3अ ब्यूटीफुल डे इन द नेबरहुड(हॉलीवूड)17 जानेवारी40 लाख रुपये
4सिक्स प्लस वन 217 जानेवारी10 हजार रुपये
5एडवेंचर किड्स17 जानेवारी30 हजार रुपये
6अवसान17 जानेवारी20 हजार रुपये
7बंकर17 जानेवारी20 लाख रुपये
8प्यार बनाम खाप पंचायत10 जानेवारी1 लाख रुपये
9शिमला मिर्ची3 जानेवारी3 लाख रुपये
10अंतर्व्यथा3 जानेवारी10 हजार रुपये
11एसीआयडी : एस्टॉन्डिंग करेज इन डिस्ट्रेस3 जानेवारी30 हजार रुपये
12सब कुशल मंगल3 जानेवारी45 लाख रुपये
13भांगड़ा पा ले3 जानेवारी52 लाख रुपये
14इंग्लिश की टांय-टांय फिस्स3 जानेवारी

10 हजार रुपये

2019 मध्ये 23 चित्रपटांनी केली 377 कोटींची कमाई  

जर 2019 च्या जानेवारीबद्दल बोलायचे झाले तर सुमारे 23 चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले होते. सर्वच चित्रपटांनी सामूहिक स्वरूपाने सुमारे 377.7 कोटींचे कलेक्शन केले होते. मात्र यामध्ये 245.36 कोटी रुपये एकट्या विक्की कौशल स्टारर 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' ने कमावले होते, जो जानेवारी 2019 चा एकुलता एक यशस्वी चित्रपट होता.  

2011 पासून आतापर्यंतच्या सर्व जानेवारीची अवस्था... 

वर्षरिलीज चित्रपट कुल कमाईयशस्वी चित्रपट1 कोटीपेक्षा कमी कमवणारे चित्रपट
20118124 कोटी रुपये33
20128155 कोटी रुपये14
201314167 कोटी रुपये210
201410202.6 कोटी रुपये33
201515204.5 कोटी रुपये18
201614256.4 कोटी रुपये17
201716303 कोटी रुपये210
201822348 कोटी रुपये114
201923377.7 कोटी रुपये117
202030 पेक्षा जास्त386 कोटी रुपये (कमाई सुरु आहे)114