आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवी कपूरच्या आगामी 'गुंजन सक्सेना' चित्रपटाचे तीन पोस्टर रिलीज; सोशल मीडियावर शेअर केले पोस्टर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल'चा फर्स्ट लुक समोर आला आहे. खुद्द जान्हवी कपूरने सोशल मीडियावर तीन पोस्टर केले. यामध्ये एका पोस्टरमध्ये ती कागदी विमान उडवताना, दुसऱ्यात फ्लाइट लेफ्टनंटच्या गणवेशात तर तिसऱ्या पोस्टरमध्ये ऑनस्क्रीन वडील पंकज त्रिपाठीसोबत दिसून येत आहे. 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' 13 मार्च 2020 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जान्हवीने कॅपशनमध्ये लिहिले. जान्हवीने चित्रपटाचे निर्माते करण जोहर, धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्वा मेहता, अभिनेता पंकज त्रिपाठी आणि अंगद नेगी यांना टॅग केले. 

करण जोहने देखील शेअर केले पोस्टर 
चित्रपटाचे निर्माता करण जोहरने तिन्ही पोस्टर शेअर केले आहेत. यातील एकासोबत त्याने लिहिले की, 'मुली पायलट होऊ शकत नाही असे तिला नेहमी सांगितले जायचे. पण तिला आकाशात झेप घेण्याची इच्छा होती.'
दुसऱ्या पोस्टरसोबत त्याने सांगितले की, 'गुंजनचे वडील तिच्यासोबत उभे होते. त्यांनी तिला उडण्यासाठी पंख दिले.'
 
&n

                         

 

कारगिल युद्धात महत्वाची भूमिका
गुंजन सक्सेनाने 1999 च्या कारगिल युद्धात महत्वाची भूमिका पार पाडली होती. कारगिल युद्धात केलेल्या कामगिरीमुळे तिला शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गुंजनने वयाच्या 5 वर्षी पहिल्यांदा फायटर प्लेन पाहिल्यानंतर ते उडवण्याचे ती स्वप्न पाहत होती असे सांगतिले जाते. 
 
 
 
 
 
 
 

बातम्या आणखी आहेत...