Japan / जपान : लोकांना विमानाेड्डाणाची माहिती देण्यासाठी हॉटेलच्या खोलीत कॉकपिट, भाडे 19 हजार रु.

63 लाखांत तयार झाले कॉकपिट, बुकिंग 18 जुलैपासून

वृत्तसंस्था

Jul 14,2019 10:02:00 AM IST

टोकियो | जपानच्या टोकियोमधील हनेदा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हॉटेलमधील एका खोलीत कॉकपिट तयार करण्यात आले आहे. लोकांना विमानोड्डाणाची माहिती मिळावी, असा यामागचा हेतू आहे. खोलीला “सुपरर कॉकपिट रूम” असे नाव देण्यात आले आहे. या कॉकपिटमध्ये ९० मिनिटांचे फ्लाइंग सेशन असेल. याचे भाडे १९ हजार रुपये इतके आहे. याची बुकिंग १८ जुलैपासून सुरू होणार आहे. हॉटेल मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, या खोलीसाठी ६३ लाख रुपये खर्च आला आहे.

X
COMMENT