आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Japan : Businessmen Will Distribute Rs 64 Crore To Their Twitter Followers, So That People Can Be Happy With It

जपानी व्यावसायिक आपल्या ट्विटर फॉलोअर्समध्ये 64 कोटी रूपयांचे करणार वाटप, लोकांनी आनंदीत राहण्याचा उद्देश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - जपानचे अब्जाधीश युसाकू मीजावा ट्विटरवर त्यांना फॉलो करणाऱ्यांना लोकांना 64 कोटी रुपये वाटणार आहेत. हा एक सामाजिक प्रयोग असल्याचे मीजावा यांनी सांगितले. ते म्हणाले की, पैशाचा समृद्धीवर कसा परिणाम होतो हे मला पहायचे आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मीजावा यांच्या ट्विटला रिट्वीट करणाऱ्या लोकांमध्ये या रकमेचे वाटप होणार आहे. याच फॉलोअर्स पैकी एक हजार युजरची निवड करण्यात आली आहे. मीजावा म्हणतात की, माझ्या पैशाचा त्यांच्या जीवनावर काय परिणाम होतो हे मला जाणून घ्यायचे आहे. नियमित अंतरावरील सर्वेक्षणातून ते याबाबत जाणून घेतील.  

मीजावाचे ट्विटरवर 6.8 मिलियन फॉलोअर्स


व्यावसायिक मीजावा यांनी 2010 मध्ये ट्विटर ज्वाइन केले होते. आता त्यांचे 6.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. 43 वर्षीय मीजावा काही दिवसांपूर्वी त्यांची प्रेयसी आयमे गोरिकीपासून वेगळे झाल्यानंतर चर्चेत आले होते. याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली होती. तेव्हा त्यांचे 70 लाख फॉलोअर्स वाढले. मीजावा यांच्याकडे तब्बल दोन अरब डॉलरची संपत्ती आहे.