आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिकसाठी येणाऱ्या मुस्लिम खेळाडूंच्या सुविधेसाठी जपानमध्ये फिरती मशीद , ५० जण नमाज पढू शकतात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - जपानची राजधानी टोकियोमध्ये पुढील वर्षांत ऑलिम्पिक स्पर्धा होतील. यामुळे  टोकियोमध्ये फिरत्या मशिदी तयार करण्यात आल्या आहेत. बाहेरच्या देशातून येणाऱ्या खेळाडू व प्रेक्षकांना नमाज पढण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून ही सुविधा देण्यात येणार आहे. या मशिदी स्टेडियमच्या बाहेर उभ्या करण्यात येणार आहेत. यात हात धुण्यापासून नमाजासाठी मॅट्सची सुविधा आहेत. या मशिदी टोकियोतील स्पोर्टस अँड कल्चर इव्हेंट कंपनीने तयार केल्या आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या ट्रकचे रुपांतर मशिदीसारखे करण्यात आले आहे. या जेथे उभ्या राहतील तेव्हा रिमोटने त्याची मागील बाजू उघडेल.  एक शिडी बाहेर येईल. त्यानंतर आतील भागाचे ५५१ चौरसफूट आकाराच्या हॉलमध्ये रुपांतर होईल. यात ५० लोक नमाज पढू शकतात. 

 

> टोकियोमध्ये चार मशिदी आहेत. यामुळे बाहेरच्या देशातून येणाऱ्या मुस्लिमांना नमाज पढण्यास अडचणी होत्या. त्यामुळे या मशिदी त्यांना योग्य राहतील. जपानमध्ये पहिली मशीद काबे येथे १९३५ मध्ये तयार करण्यात आली. देशभरात सुमारे ६० मशिदी आहेत. 

 

> फिरत्या मशिदीचा वापर २०१६ मध्ये इंडोनेशियात सुरू करण्यात आला. तो यशस्वीही ठरला. प्रयोगानुसार इंडोनेशियात हिरव्या रंगाची व्हॅन जेथे गर्दी असते तेथे हमखास दिसून येते.