आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हगिबीस वादळाने २६ मृत्यू; १५० जखमी, ३० बेपत्ता; ६० वर्षांतील सर्वात भयंकर वादळ, लष्कराला केले पाचारण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - जपानमध्ये रविवारी आलेल्या हगिबीस वादळामुळे विविध भागात ५० हून जास्त भूस्खलनाच्या घटनांत २६ जणांचा मृत्यू झाला  तर ३० जण अजूनही बेपत्ता असून १५० जण जखमी झाले आहेत. 

टोकियो महानगरासह अन्य क्षेत्रातील १ लाख ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांच्या घरातील वीजपुरवठा खंडित आहे. बचाव पथक युद्धपातळीवर सक्रिय असून मदतकार्यासाठी हेलिकॉप्टरचीदेखील मदत घेण्यात आली आहे. नागोना प्रांताला सर्वाधिक फटका बसला असून मुसळधार पावसामुळे चिकुमा नदीला पूर आला आहे. सुमारे २० हजार घरांत पाणी घुसले आहे.  मदतकार्यात १ लाख लोक सहभागी झाले असून त्यात ३१ हजारावर सैनिक आहेत. १.३५ लाख लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यांत हलवण्यात आले आहे. 

जपान रेल्वे कंपनीच्या नागोना स्टेशनजवळील रेल्वे यार्डमध्ये पार्क केलेली बुलेट ट्रेनही पुराच्या पाण्यात बुडाली आहे. १० रेल्वेंच्या १२० डब्यांचे नुकसान झाल्याचे कंपनीने सांगितले आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे म्हणाले की, शक्तिशाली हगिबीसमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आणि लोकांना वादळापासून वाचवण्यासाठी, सर्व शक्य उपाययोजना करण्यासाठी सरकार आपत्कालीन कार्यदल स्थापन करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...