आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Japan : It Would Be Illegal To Starve Children On Mischief, Parents Would Be Guilty; Taunting Will Be Heavy

खोडकर मुलांना उपाशी झोपवणे बेकायदेशीर, आई- वडिलांना दोषी मानले जाईल;मुलांना चापट मारू शकत नाही

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

टोकियो - जपानमध्ये आता आई-वडील आपल्या मुलांना कोणतीच शिक्षा देऊ शकणार नाहीत, ती मुलांना शिस्त लावण्यासाठी असली तरी. जपानच्या मंत्रिमंडळाच्या (यात पंतप्रधानांसह अनेक वरिष्ठ मंत्र्यांचा सहभाग आहे) प्रस्तावावर देशाच्या आरोग्य मंत्रालयाने दिशानिर्देशांचा मसुदा तयार केला आहे. तो याच आठवड्यात प्रसिद्ध केला जाईल. चर्चेनंतर त्याला अंतिम रूप दिले जाईल.

आई-वडिलांना मुलांवर हात उचलण्यापासून रोखणे हाच नव्या बाल उत्पीडन विधेयकाचा हेतू आहे. मुलांसोबत अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे मंत्रिमंडळाने यात बदल करण्याचे सुचवले आहे. नवीन मसुद्यानुसार कोणत्याही शारीरिक पीडा देणाऱ्या शिक्षेला मनाई करण्यात आली आहे. मग ती शिक्षा कितीही हलकी असो ती देता येणार नाही. मुलांना अनेक वेळा समजावून सांगितल्यानंतरही ते ऐकत नाहीत यामुळे गालावर थप्पड लगावली, मित्रांसोबत मारामारी केली म्हणून शिक्षा द्यावी असे तर्क अनेकदा आई-वडील देतात, असे यात म्हटले आहे. मुलांना भावनिक अत्याचारापासून रोखण्याचाही प्रयत्न नवीन मसुद्यात करण्यात आला आहे. तू जन्मला नसता तर चांगले झाले असते,  असे आई- वडील कितीही त्रास झाला तरी मुलांना सांगू शकत नाहीत की, असा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. असे बोलणे मौखिक दुर्व्यवहार मानला जाईल. मुलांच्या हक्कांचे उल्लंघन असले मानले जाईल.

तसेच अभ्यास किंवा इतर उपक्रमांबाबत मुलांची इतर भाऊ- बहिणीशी किंवा त्यांच्या मित्रांशी तुलना करत त्यांना कमी लेखणे किंवा दुर्लक्ष करणे बेकायदेशीर असेल. तरीही आई- वडिलांनी असे केले तर त्यांना काय शिक्षा द्यावी, यावर सध्या विचार होणे बाकी आहे. मोठा दंडही केला जाईल. नवीन कायदा पुढील वर्षी मार्चपासून लागू होईल.मंत्रालयाचे स्पष्टीकरण: आई- वडिलांचे हक्क कमी करत नाहीत

या मसुद्यावर हरकती यायला लागल्या आहेत. यावर आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की,आम्हाला आई- वडिलांचे अिधकार कमी करायचे नाहीत. मुलांच्या मनावर कोणताही वाईट परिणाम होऊ नये एवढेच आम्हाला हवे आहे. मुलांच्या भावना समजून घेत चर्चेतून अडचणी दूर कराव्यात एवढाच प्रयत्न आहे.