आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Japan : Students Agitation Warning Against Decision To Remove Girls From School Because Their Hair Is Not Black

केस काळे नाहीत म्हणून मुलींना शाळेतून काढण्याच्या निर्णयावर जपानमध्ये विद्यार्थ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - जपानमध्ये काही दिवसांपूर्वी अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कार्यालयांत महिलांना चष्मा घालण्यावर बंदी घातली आहे. आता या देशात शाळकरी मुलांनीही सरकारविरुद्ध आघाडी उघडली असून “ब्लॅक कोसुकू’ परंपरेच्या बंदीपासून मुक्ती मिळावी, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, जपानमध्ये बहुतांश शाळांतील विद्यार्थिनींना केस काळे नाहीत म्हणून घरी पाठवले जाते.  विद्यार्थ्यांच्या केसांची लांबी कमी आहे, विद्यार्थिनींनी कोणत्या रंगाचे अंतर्वस्त्र परिधान करायला हवेत, दूरच्या प्रवासावर जाण्यापूर्वी शाळांना दोन महिने आधी माहिती दिली जावी अशा सूचनांमुळे पालक-विद्यार्थी अत्यंत वैतागले आहेत. शालेय बोर्डाने ही बंधने तत्काळ कमी केली नाहीत तर सरकारविरुद्ध आता रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध आंदोलन करण्यास जपानमध्ये पूर्णत: बंदी आहे. दुसरीकडे, सरकारने म्हटले आहे की, एप्रिल २०२० पासून सुरू होत असलेल्या नव्या सत्रापासून ही बंधने काढून घेतली जातील. कठोर ड्रेस कोडसाठी जपानची जगभरात ख्याती आहे. शाळांमध्येही या ड्रेस कोडसाठी कडक नियम आहेत. या नियमांमुळे विद्यार्थी आणि पालक वैतागले आहेत. आम्ही काय करावे हे देशाचे सरकार ठरवू शकत नाही...
 
जपानमध्ये सार्वजनिक संस्थांतील कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू आहे. पुरुषांना सूट आणि गडद रंगाचे बूट, तर महिलांना स्कर्टसोबत हाय हिल्स बंधनकारक आहे. ट्विटरवर एक युजर शोमिजू ताकाहाशीने पोस्ट केले आहे की, “कोणता ड्रेस घालावा एवढे स्वातंत्र्यही आता मुलींना राहिलेले नाही. आम्ही काय करावे हे सरकार ठरवू शकत नाही. हाच स्वातंत्र्याचा अर्थ आहे का?’