आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Japan: The Women Leaders Were Held Guilty By The Council, They Changed The Rules Of The Conference, 10 Council Leaders Gathered Together

जपान: महिला नेत्याला मुलासह परिषदेत केला मज्जाव, त्यांनी परिषदेचे नियमच बदलले, १० परिषदांच्या नेत्या आल्या एकत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - जपानच्या नेत्या आणि नगरसेविका युका ओगाता यांनी जेव्हा प्रथमच ७ महिन्यांच्या मुलाला घेऊन कुमामोतो नगर परिषदेच्या बैठकीत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचा हा अनुभव खूप वाईट राहिला. जेव्हा त्या मुलाला मैत्रिणीकडे सोडून आल्या तेव्हा त्यांना परिषदेत येऊ देण्यात आले.


ही समस्या फक्त युका यांचीच नाही, जपानमध्ये नोकरदार मातांचा असाच छळ केला जात आहे. त्यावर डे-केअरच्या कमतरतेमुळे  समस्या आणखी वाढली आहे. युकांनी या समस्येवर मात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. १० नगर परिषदांच्या महिला त्यांच्यासोबत आल्या आहेत. त्यांनी कुमामोतो नगर परिषदेत अनेक बदल लागू केलेा आहेत. पुन्हा निवडून आल्याने जनतेचेही समर्थन आहे. मुलाची देखभाल करता यावी यासाठी त्या बहुतांश काम घरूनच करतात.  त्यांनी महापौरांसोबतची चर्चाही वीकेंडला ठेवणे सुरू केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ताओ अमानो यांनी मिराओ संस्था सुरू केली आहे. ती डे-केअरच्या समस्या दूर करण्यास मदत करते. त्यांच्या संस्थेने हॅशटॅग आय वाँट डे-केअर मोहीम सुरू केली आहे. तीत आई-वडिलांना डे-केअर रिजेक्शन लेटर देण्यास सांगितले जाते. सरकारवर दबाव राहावा हा त्यामागील हेतू आहे.