आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Japanese Billionaire To Seek Life Partner, Ask For Applications To Go To The Moon

चंद्रावर जाण्यासाठी अब्जाधीशाला हवीये 'लाईफ पार्टनर', अर्ज मागवले; 2023 मध्ये करणार अंतराळाची सफर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - जपानच्या फॅशन टायकून युसाकू मीजावा चंद्रावर प्रवास करण्यासाठी एक जीवनसाथीच्या शोधात आहेत. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक जाहीरात करून अर्ज मागवले आहेत. 44 वर्षीय युसाकू चंद्रावर जाणारे पहिले सामान्य प्रवासी असतील. 2023 मध्ये ते स्टारशिप या रॉकेटद्वारे उड्डाण करणार आहेत. 1972 नंतरचे हे पहिले मानव मून मिशन असणार आहे. 


मीजावा यांनी ऑनलाइन अपीलमध्ये म्हटले आहे की, ते खास महिलेसोबत अनुभव साजरा करायचा आहे. त्यांनी आपल्या 'प्लांड मॅच-मेकिंग इव्हेंट' या वेबसाइटअंतर्गत महिलांकडून अर्ज मागवले आहेत. युसाकू मीजावा यांचे नुकतेच प्रेयसी आयमे गोरिकी(27) सोबत ब्रेकअप झाले होते. युसाकू म्हणाले - "मी आजपर्यंत माझे आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगत आलो आहे. मी आता 44 वर्षांचा झालो आहे आणि स्वतःला एकटेपणा वाटू लागला आहे. एकटेपणाची ही भावना माझ्यावर वरचढ ठरत आहे. यामुळे मला साथीदार हवा आहे. मला अंतराळात माझे प्रेमाची जाणीव करून घ्यायची आहे."  मीजावाची एकूण मालमत्ता सुमारे दोन अब्ज डॉलर्स आहे.

वेबसाइटवर अटींसह वेळापत्रक दिले आहे


मीजावा यांच्या वेबसाइटवर अटी आणि वेळपत्रकाची यादी दिली आहे. ही प्रक्रिया अंदाजे तीन महिने चालेल. एका अटीनुसार, अर्जदार सिंगल असणे आवश्यक आहे. याशिवाय तिचे वय 20 वर्षांपेक्षा जास्त असू नये. तिचा विचार सकारात्मक असण्यासोबतच तिला अंतराळात जाण्याची इच्छा असायला हवी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी आहे. मीजावा यांच्या पार्टनरचा अंतिम निर्णय मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ठरवण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...