आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेंशन कमी करण्यासाठी कृत्रिम ब्वॉयफ्रेंडची केली निर्मिती; मिठी मारताच गाणे वाचवेल, एकटेपणा दूर करेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - जपानची व्हिडिओ गेम कंपनी लेव्हल-5 ने ओतोमे युशासोबत मिळून एक कृत्रिम ब्वॉयफ्रेंड तयार केला आहे.  मुली आणि महिला या ब्वॉयफ्रेंडला मिठी मारुन आपले टेंशन दूर करू शकतील. तसेच याला आपल्यासोबत रेस्तराँ, फिल्म थिएटर किंवी शॉपिंग सेंटर अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. 'ब्वॉयफ्रेंड हग स्पीकर्स' असे या प्रोडक्ट नाव आहे. 
 

असा असेल हा ब्वॉयफ्रेन्ड
दोन मोठे हात असणाऱ्या प्रोडक्टसोबत पांढऱ्या रंगाची उशी लावण्यात आली आहे. यावर कंपनीचा नवीन गेम 'हिरो ऑफ मेडन्स'च्या मुख्य व्यक्तिरेखेचे स्केच बनवण्यात आले आहे. महिलांना अधिक कंफर्टेबल वाटण्यासाठी दोन्ही हातांमध्ये ब्लूटुथ स्पीकर्स बसवले आहेत. ब्वॉयफ्रेंडला मिठी मारताच हे स्पीकर्स वाजतात. 

कंपनीने एकच सेट तयार केला, स्पर्धेच्या विजेत्याला मिळणार हा सेट
या ब्वॉयफ्रेंड स्पीकरला प्राप्त करणे सोपी गोष्ट नाहीये. कारण ओतोमे युशाने फक्त एकच सेट तयार केला आहे. तो पण विक्रीसाठी नाही. पण एकादा नशीबवान विजेता याला प्राप्त करू शकतो. ओतोमे युशा कंपनी यासाठी ट्विटरवर एक स्पर्धा सुरु केली आहे. स्पर्धेच्या विजेत्याचे नावाची 9 ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात येणार आहे.