आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसामात जपानी तापीचा कहर: आतापर्यंत 56 रुग्णांचा मृत्यू, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बिहारमध्ये चमकी तापीची दहशत असतानाच आसाममध्ये विचित्र जपानी तापीची साथ पसरली आहे. या विचित्र आजारात आतापर्यंत एप्रिलपासून आतापर्यंत 56 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 3 महिन्यांत जपानी तापीचे 216 रुग्ण समोर आले आहेत. आसाम सरकारने येत्या सप्टेंबरपर्यंत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. बिहारमध्ये होणारा चमकी ताप आणि आसामच्या जपानी तापमध्ये फरक असल्याचे संशोधन देखील नुकतेच समोर आले आहेत. बिहारच्या गोरखपूर आणि मुजफ्फरपूर येथे पसरलेल्या चमकी बुखारला इन्सेफलायटिस आजार असेही म्हटले जात आहे. या आजाराने बिहारमध्ये शेकडोंचा जीव घेतला. या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांना जास्तीत-जास्त ऑक्सिजनची नितांत गरज असते. संशोधकांनी जपानी आणि चमकी तापमध्ये फरक सांगितला आहे. या आजारांपासून कसे वाचता येईल यावर काही उपाय-योजना आहेत.


जपानी ताप म्हणजे काय? त्यावर उपाय कोणते?
जपानी एन्सेफलायटिस एक प्रकारचा मेंदूज्वर आहे. जपानी ताप एक व्हायरस असून ते डास किंवा डुकरांच्या माध्यमातून पसरला आहे. त्यामुळे, स्वच्छता हा रोग टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. एकदा हा व्हायरस शरीराच्या संपर्कात आल्यास थेट मेंदूपर्यंत पोहोचतो. अशात मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते. हा आजार स्पर्श केल्याने पसरत नाही. 1 ते 15 वर्षांपर्यंतची मुले-मुली आणि 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले लोक या आजाराचे बळी ठरू शकतात. पावसाळा आणि हिवाळ्याचा मधला काळ या रोगाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असतो.


ही आहेत एन्सेफलायटिस अर्थात मेंदूज्वरची लक्षणे...
या रोगाने ग्रस्त झालेल्या 50 ते 60 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. ताप, डोकेदुखी, मानदुखी, कमकुंवतपणा आणि उलटी येणे ही रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. रोग वाढत गेल्यास डोकेदुखी आणि वीकनेस सुद्धा वाढत जाते. भूक न लागणे, अतीताप येणे, मळ-मळ होणे आणि भ्रम होणे अतीसंवेदनशील होणे इत्यादी लक्षणे सुद्धा दिसून येतात. वेळीच उपचार न झाल्यास काहींमध्ये वेडेपणा, लकवा मारणे किंवा कोमात जाणे असे प्रकार सुद्धा घडू शकतात. तान्ह्या बाळाला भूक न लागणे, सतत रडत राहणे, ताप, उलट्या इत्यादी लक्षणे दिसून येऊ शकतात.
 

बातम्या आणखी आहेत...