आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्त सुविधांमुळे जपानी ज्येष्ठांची तुरुंगांना पसंती! 20 वर्षांमध्ये मुद्दाम गुन्हे करणाऱ्या ज्येष्ठांची संख्या तिपटीने वाढली 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो- तुरुंगाचे नाव उच्चारले तरी भल्याभल्यांची भंबेरी उडते. पण जपानमध्ये मोफत जेवण आणि तुरुंगात मिळणारे स्वातंत्र्य तसेच आरोग्य सुविधा पाहता मागील २० वर्षांत ज्येष्ठ नागरिक तुरुंगात जाण्याची संख्या तिपटीने वाढली आहे. तुरुंगात जाऊन राहण्यासाठी या देशातील ज्येष्ठ नागरिक सातत्याने गुन्हे करून अटक करवून घेत आहेत. १९९७ मध्ये २० गुन्हेगारांमध्ये ६५ वर्षांवरील एखादा गुन्हेगार असायचा. आता हा आकडा ५ पर्यंत पोहोचला आहे. २०१६ मध्ये अडीच हजारांवर ज्येष्ठांना दोषी ठरवण्यात आले होते. जपानची लोकसंख्या १२.६८ असून यात ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे ३ कोटी लोक राहतात. 

 

हिरोशिमातील ६९ वर्षीय तोशिया तकाता यांनी ८ वर्षे तुरुंगात घालवले आहेत. मी गरीब असल्याने आणि जेथे मोफत खाण्या-पिण्याची व्यवस्था होईल, अशा ठिकाणी जाण्याची मला इच्छा होती. शिवाय पेन्शनचे आयुष्य जगताना पैसे खर्चण्याची इच्छा नसल्याने मी मुद्दाम तुरुंगात गेलो, असे तोशिया म्हणाले. तोशिया यांनी पहिला गुन्हा वयाच्या ६२ व्या वर्षी केला. न्यायालयाने वयाचा विचार करून दया दाखवत त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांनी अनेकदा गुन्हे केले. महिलेने घाबरून पोलिसांना बोलवावे म्हणून तोशिया यांनी तिच्यावर चाकू उगारला होता. तुरुंगात जाऊन बाहेर पडेपर्यंत मी बरेच पैसे वाचवले होते. ७० वर्षांच्या ओकुयाना म्हणाल्या की, पतीसोबत राहण्याची इच्छा असल्याने मी चोरी केली होती. अनेक महिलांना धड चालताही येत नाही, तरी दोन वेळेचे जेवण आणि पैसा मिळत नसल्याने त्या गुन्हा करत आहेत. 

 

भारतात मात्र तुरुंगांची संख्या अतिशय वाईट आहे. येथे पक्क्या कैद्यांना साधनसुविधा मिळत नाहीत. शिवाय देशातील बहुतांश तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. या कारणामुळेही तुरुंग प्रशासनाला कैद्यांना सुविधा पुरवताना अडचणींचा सामना करावा लागतो. 

 

सुरक्षा रक्षक बदलतात ज्येष्ठ नागरिकांचे डायपर 
जपानमध्ये तुरुंगातील सुरक्षा रक्षक ज्येष्ठ नागरिकांची चांगली देखभाल करतात. तुरुंगातील सुरक्षा व्यवस्था पाहण्याऐवजी ज्येष्ठ नागरिकांचे डायपर बदलणे, त्यांना अंघोळ घालणे आणि फिरवण्याची जबाबदारी सुरक्षा रक्षक पार पाडतात. अनेक ज्येष्ठांना तर कुटुंबाऐवजी तुरुंगाचे वातावरण आवडत आहे. अनेक तुरुंगांमध्ये तर टीव्हीची व्यवस्था करण्यात आली. 

 

बातम्या आणखी आहेत...