आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्प अाेसाकाने रचला इतिहास; सेरेनाने खेळला वादाचा सामना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयाॅर्क- जपानच्या २० वर्षीय नाअाेमी अाेसाकाने रविवारी एेतिहासिक कामगिरी नाेंदवली. तिने सत्रातील शेवटच्या अमेरिकन अाेपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा किताब पटकावला. यासह तिने करिअरमध्ये पहिला ग्रँडस्लॅम किताब पटकावला. तसेच ग्रँडस्लॅम चॅम्पियन ठरलेली अाेसाका ही जपानची पहिली महिला टेनिसस्टार ठरली. 


जपानच्या युवा टेनिसपटू अाेसाकाने फायनलमध्ये सहा वेळच्या चॅम्पियन सेरेना विल्यम्सवर मात केली. तिने सरस खेळी करताना सरळ दाेन सेटमध्ये अंतिम सामना जिंकला. तिने ६-२, ६-४ अशा फरकाने विजयश्री खेचून अाणली. यासह ती या किताबाची मानकरी ठरली. तिने करिअरमध्ये पहिल्यांदा ग्रँडस्लॅम चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. या फायनलमध्ये माजी नंबर वन सेरेनाने सातत्याच्या चुकांमुळे नियमांचे उल्लंघन करताना पंचाशी वाद घातला. यातूनच तिचा यादरम्यान वादाचा सामना रंगला. दुसरीकडे जपानच्या अाेसाकाने चिवट खेळीच्या अाधारे शर्थीची झुंज देताना एकतर्फी विजयाची पताका फडकावली. यासह तिने सेरेनाचे या किताबाचे वर्चस्वही संपुष्टात अाले. 


जपानची पहिली ग्रँडस्लॅम चॅम्पियन 
टेनिसच्या विश्वात अाता २० वर्षीय अाेसाकाने माेठी छाप पाडली. तिने काेणत्याही ग्रँडस्लॅममध्ये चॅम्पियन ठरलेली जपानची पहिली महिला टेनिसपटू हाेण्याचा बहुमान पटकावला. यातूनच ती पुरुष अाणि महिलांच्या गटात या स्पर्धेचा किताब जिंकणारी एकमेव ठरली. यामुळे अाता तिचा इतिहास हा सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. 


सेरेनाचे स्वप्न भंगले 
अमेरिकेच्या ३६ वर्षीय टेनिसपटू सेरेनाचे अापल्या करिअरमधील २४ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले. तिला सुमार खेळीचा माेठा फटका बसला. याच खेळीचा फायदा घेताना जपानच्या युवा टेनिसपटूने फायनलमध्ये बाजी मारली. या पराभवाने सेरेनाचा सातव्यांदा अावडत्या टेनिस काेर्टवर चॅम्पियनचा प्रयत्नही अपयशी ठरला. 


अाेसाकासाठी एेतिहासिक यश 
अापल्या टेनिस करिअरमध्ये अाेसाका ही अमेरिकन स्टार सेरेनाला अापली अादर्श खेळाडू मानते. त्यामुळे तिच्या कामगिरीच्या अाधारेच अाेसाकाने टेनिसचे धडे गिरवले. मात्र, अाता चक्क अापल्या अावडत्या खेळाडू सेरेनालाच फायनलमध्ये धूळ चारल्याचा पराक्रम अाेसाकाने गाजवला. हेच एेतिहासिक यश अापल्यासाठी स्वप्नवत वाटत असल्याची प्रतिक्रिया अाेसाकाने दिली.

 
शाब्दिक वादातून कारवाई 
सामन्यादरम्यान सेरेनाने पंच रामाेस यांच्यासाेबत वाद घातला. यातूनच मैदानावर तिने अापल्या सर्व्हिसपेक्षा अाक्रमक अावाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, याचाच तिला माेठा फटका बसला. कारण याच शाब्दिक वादामुळे तिच्यावर पेनल्टीची कारवाई झाली. 

बातम्या आणखी आहेत...