आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जरांडीत पाेलिसांचा उलटा न्याय : पीडित मुलींच्या पालकांनाच नोटिसा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद - जरांडी (ता. साेयगाव) येथील जिल्हा परिषद शाळेत सहावी ते आठवीत शिकणाऱ्या २१ मुलींचा नऊ महिन्यांपासून लैंगिक छळ करणारा मुख्याध्यापक हरदास काटाेले याला राजकीय दबावापाेटी अभय देणाऱ्या पाेलिसांनी पीडित मुलींच्या पालकांना पुन्हा धमकावण्यास सुरुवात केली आहे. ‘दिव्य मराठी’ने शुक्रवारच्या अंकात पाेलिसांचा बेजबाबदारपणा उघड केल्यानंतर कारवाईचा दिखावा करण्यासाठी पाेलिसांनी ‘पाॅस्काे’ कायद्याअंतर्गत साेयगावचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी व पीडित पाेलिसांच्या पालकांना नोटिसा बजावल्या. ‘शाळेत मुलींचा छळ हाेत असल्याची माहिती असताना आम्हाला का कळवले नाही,’ असा जाब या नोटिशीच्या माध्यमातून विचारण्यात आला. 


विशेष म्हणजे, बुधवारीच पीडित मुलींच्या पालकांच्या वतीने तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विष्णू वाघ व शिक्षण समितीचे अध्यक्ष गाेविंद राठाेड यांनी मुख्याध्यापक काटाेलेच्या विराेधात लेखी तक्रार केली हाेती. मात्र याच पाेलिसांनी त्या वेळी बदनामीची भीती दाखवत पालकांना तक्रार मागे घ्यायला लावली हाेती. आता तेच पोलिस पालकांना नोटिसा बजावत उलटा न्याय करत असल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. पीडित मुलींचे व्हिडिआे जबाब मिळवून त्या आधारे आराेपी मुख्याध्यापकाविराेधात पाेलिसात तक्रार करणार असल्याचे गटविकास अधिकारी एम.सी. राठाेड यांनी गुरुवारी 'दिव्य मराठी'शी बाेलताना सांगितले हाेते. त्यामुळे राठाेड यांनाही नाेटीस बजावून अप्रत्यक्षपणे धमकावण्याचा प्रयत्न पाेलिस करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...