आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विष' मालिकेतून पदार्पण करणार जसलीन मथारू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिग बॉस-12 मधून चर्चेत आलेली जसलीन माथारू पुन्हा एकदा टीव्हीवर दिसणार आहे. गायिका-मॉडेल जसलीनने आपली पहिली टीव्ही मालिका  ‘विष’ मधून टीव्हीवर करियर सुरू करणार आहे. याविषयीची माहिती तिने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यात ती सहकलाकार विशाल वशिष्ठ आणि देबिना बैनर्जीसोबत दिसत आहे. मालिकेत मुख्य अभिनेत्री आलिया (सना मकबूल खान) आणि सबरीना (देबिना बनर्जी) मध्ये सत्तेची लढाई दाखवली जात आहे. मालिकेत एका वळणावर जसलीनची एंट्री होणार आहे.   जसलीन एक अभिनेत्री म्हणून करिअर सुरू करण्यासाठी खूप उत्सुक आहे. ती म्हणाली ... ‘कलर्सशी माझे संंबंध अप्रतिम आहे. मी मागील वर्षी ‘बिग बॉस -12’ मधून प्रवास सुरू केला होता. आता मी ‘विष’ मालिकेतून परत आले आहे. जलक्षिणीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी खूप उत्साही आहे. हे एक अवघड पात्र आहे जे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. ही संधी मला मिळाली, यासाठी मी वाहिनीचे आभार मानते. मालिकेतील आलिया आणि आदित्यला एकमेकांपासून दूर करण्यासाठी माझी एंट्री झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...