Home | TV Guide | jaslin matharu and megha dhade will be eliminate from big boss season 12

80 दिवसांनंतर जसलीन गेली बिग बॉसच्या घरातून बाहेर, 37 वर्षे मोठया भजन सिंगरला बॉयफ्रेंड सांगून केली होती घरात एन्ट्री

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 10, 2018, 12:58 PM IST

बिग बॉसच्या 12 व्या सीझनच्या अंतिम फेरीची तारीखही झाली जाहीर..

 • jaslin matharu and megha dhade will be eliminate from big boss season 12

  एंटरटेन्मेंट डेस्क : नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असणारा शो 'बिग बॉस' मध्ये आता एक नवीन ट्विस्ट दिसणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागच्या आठवड्यात एकही स्पर्धकाला घरातून बाहेर काढले नव्हते. त्यामुळे यावेळी आता दोन स्पर्धकांना बाहेर काढले जाणार आहे. जसलीन माथारू आणि मेघा धाडे यांना यावेळी घरातून बेघर केले जाणार आहे. द खबरीने ट्विट करून ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

  80 दिवस बिग बॉसच्या घरात राहिली जसलीन..
  - 28 वर्षीय जसलीन माथारुने 37 वर्ष मोठया भजन सिंगर अनुप जलोटासोबत या शोमध्ये एंट्री केली होती. शोच्या सुरुवातीलाच दोघांनीही आपले नाते मान्य केले होते. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. बिग बॉसच्या घरातही या दोघांच्या नात्याची खूप खिल्ली उडवली गेली. एवढेच नाही तर सोशल मिडियावरही या दोघांना खूप ट्रोल केले गेले.
  - वास्तविक घरातून बाहेर आल्यानंतर अनुप जलोटाने हे सर्व खोटे असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की त्यांनी हे सर्व बिग बॉसच्या सांगण्यावरून केले होते. त्यांनी हे सुद्धा सांगितले. जसलीनचे वडील केसर मेथारू यांचीच इच्छा होती की, मी जसलीनसोबत या शोमध्ये जावे. जसलीनला जेव्हा कळले की अनुप त्यांच्या नाते खोटे असल्याचे सांगत आहेत तेव्हा ती खूप नाराज झाली होती. 80 दिवस घरात राहिल्यानंतर जसलीनला आता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

  सलमानने केले होते मेघावर कमेन्ट..
  मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठीची विजेती असलेली मेघा धाडेही यावेळी शो मधून बाहेर जाणार आहे. मराठी शो जिंकल्यानंतर तिला या शोमध्ये व्हाइल्ड कार्ड एंट्री दिली गेली होती. पण ती या शोमध्ये काही खास करू शकली नाही. स्वतः सलमानने मेघावर कमेन्ट करताना म्हटले होते की, 'मेघा तो कही दिख ही नाही रही.'

Trending