आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jason Collins Will Make Kangana Ranaut A Jayalalithaa, Look Test Will Takes Place In In Los Angeles

कंगना रनोटला जयललिता बनवणार जेसन कॉलिन्स, लॉस एंजेलिसमध्ये होईल लुक टेस्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कंगना रनोटला जयललिता बनवण्याचे काम आता हॉलिवूडचे मेकअप आर्टिस्ट जेसन कॉलिन्स करणार आहेत. कंगनाची बहीण रंगोलीने ट्वीट करून याची माहिती दिली आहे. लुक टेस्टसाठी कंगना आणि तिची टीम 19 सप्टेंबरला लॉस एंजेलिससाठी रवाना होणार आहे. जेसन कॉलिन्सने 'कॅप्टन मार्वल' आणि 'ब्लेड रनर 2049' यांसारख्या चित्रपटांमध्ये कलाकारांचा मेकअप केला आहे.  
 

 

कंगनाचे दाखवले जातील चार लुक... 
चित्रपटात जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित चार फेज दाखवल्या जाणार आहेत, ज्यामध्ये त्यांची चित्रपट अभिनेत्रीपासून ते तामिळनाडूच्या सीएम बनण्यापर्यंतची कहाणी दाखवली गेली आहे.  
 

नोव्हेंबरपासून सुरु होईल शूटिंग... 
'थलायवी' चे शूटिंग याचवर्षी नोव्हेंबरपासून सुरु होईल. जो तमिळ, तेलगु आणि हिंदीमध्ये रिलीज केला जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एएल विजय करणार आहे. तर चित्रपटाची कथा के व्ही विजय प्रसादने लिहिली आहे.  
 

 

प्रोड्यूसरने सांगितले निराधार अफवा... 
याचदरम्यान चित्रपटाचे प्रोड्यूसर विष्णु इंदूरीने एक ट्वीट करून बायोपिक 'जयललिता' होल्डवर असल्याची बातमी निराधार अफवा असल्याचे सांगितले आहे. विष्णुने लिहिले, कन्फर्म ना करता आधारहीन अफवा पसरवणे खूप नैराष्यकारक आहे. 'थलायवी' च्या प्री-प्रोडक्शनचे काम जोरात सुरु आहे. शूटिंग दिवाळीनंतर सुरु होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...