• Jasprit Bumrah is India's third bowler who took a hat trick

क्रिकेट / हॅट्ट्रीक घेणारा बुमराह भारताचा तिसरा गाेलंदाज, करिअरमध्ये सर्वाेत्तम खेळी नाेंद

बुमराहपूर्वी हरभजन व इरफान पठाणच्या नावे हॅट्ट्रीकची नाेंद

वृत्तसंस्था

Sep 17,2019 02:04:09 PM IST

किंग्सटन - युवा जसप्रीत बुमराहच्या शानदार गाेलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने आता कसाेटी मालिका विजयाचा आपला दावा अधिक मजबुत केला.याशिवाय भारताने यजमान विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसाेटीवर शानदार पकड घेतली. युवा गाेलंदाज बुमराहने विंडीजच्या डावातील नवव्या षटकांत सलग तीन चेंडूंवर विकेट घेत हॅट््ट्रिक साजरी केली. अशा प्रकारची हॅट््ट्रिक साजरी करणारा ताे भारताचा तिसरा आणि जगातील ४० वा गाेलंदाज ठरला. याच धारदार गाेलंदाजीचा सामना करण्यात यजमान विंडीजचे अव्वल फलंादाज सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे विंडीजचा ४७.१ षटकांत ११७ धावांवर धुव्वा उडाला. यासह भारताने पहिल्या डावात २९९ धावांची आघाडी घेतली. आता भारताने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात २१.३ षटकांत ३ बाद ४५ धावा काढल्या. यासह भारतीय संघाने एकूण ३४४ धावांची आघाडी घेतली. भारताकडून आता चेतेश्वर पुजारा (१९) मैदानावर आहेत. मयंक अग्रवाल (४), राहुल (६) काेहली (०) स्वस्तात बाद झाला.


बुमराहने डावाच्या नवव्या षटकांत आपली हॅटट्रिक साजरी केली. त्याने या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर ब्राव्हाेला (४) बाद केले. ब्राव्हाे हा फटका मारण्याच्या प्रयत्नात राहुलच्या हातामध्ये चेंडू देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर बुमराहने तिसऱ्याच चेंडूंवर ब्रुक्सला (०) पायचीत केले. त्यामुळे त्याच्याकडून हॅटट्रिकच्या आशा निर्माण झाल्या. त्याने चाैथ्या चेंडूवर चेसला (०) पायचीत केले. दरम्यान चेंडू बॅटला लागल्याचे बुमराहला सुरुवातीला वाटले. मात्र, काेहलीने रहाणेशी चर्चा केली आणि रिव्हयू घेतला .यात ही विकेट ठरली. यातून बुमराहची हॅटट्रिक साजरी झाली.तसेच त्याने हॅटट्रिकसाठीची आपल्या तमाम चाहत्यांच्या विश्वासला सार्थकी लावले.

हनुमाचे पहिले शतक साजरे :
भारताच्या युवा फलंदाज हनुमा विहारी (१११) य ईशांत शर्माने (५७) करिअरमध्ये सर्वाेत्तम खेळी नाेंदवली. या दाेघांनी आठव्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली. कसाेटीत हनुमाने पहिले शतक व ईशांतने पहिले अर्धशतक झळकावले आहे.

X
COMMENT