आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जस्सी जैसी कोई नही' फेम मोना सिंग थाटणार आहे लग्न, 26 डिसेंबरपासून सुरु होणार लग्नाचे फंक्शन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः आपल्या वैयक्तिक आयुष्यावर बर्‍याचदा मौन बाळगणारी मोना सिंग लग्न करत आहे. 26 डिसेंबर रोजी गोव्यात तिचा प्री-वेडिंग सोहळा आहे. वृत्तानुसार, ती श्याम नावाच्या दक्षिण भारतीय बँकरशी लग्न करत आहे. लग्नाआधी मोनाने 'कहने को हमसफर है' या वेबसीरिजच्या सीझन 3 चे शूटिंग पूर्ण केले आहे.

बॉम्बे टाईम्सच्या वृत्तानुसार, गोव्यातील बॅचलरेट ट्रिपनंतर मोनाच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल.

26 आणि 27 डिसेंबर रोजी होणा-या या कार्यक्रमांमध्ये मोनाचे खास मित्र आणि कुटुंबिय सहभागी होतील. मोनाच्या लग्नाविषयी बोलताना एका सूत्राने माहिती दिली की, लग्नाच्या दिवशी तिला कोणत्याही प्रकारचे अटेंशन नको आहे. म्हणूनच, केवळ अतिशय खास लोक विवाहात सामील होतील.

बातम्या आणखी आहेत...