आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावळे द्वेषाचे नव्हे, शेतकरीहिताचे राजकारण करतात; काँग्रेसींचे बोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - शेतकरी हित आणि सहकारी संस्था वाचवण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला सारून एकत्र येण्याची परंपरा असलेल्या यावल तालुक्यात शनिवारी राजकीय सौहार्दाची हळवी बाजू नव्याने समोर आली. भरडधान्य खरेदी केंद्राच्या उद््घाटनावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन नरेंद्र नारखेडे या द्वयीने भाजपचे आमदार हरिभाऊ जावळे यांच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक करत ते कधीही द्वेषाचे राजकारण करत नाही. विरोधकांचीही कामे असल्यास स्वत:हून विचारून घेतात, अशी स्तुतीसुमने उधळली. आमदार जावळे यांनीदेखील सरकार कुणाचेही असले तरी शेतकरी हितासाठी एकत्र आले पाहिजे, असा प्रतिसाद दिला. 


शनिवारी सकाळी १० वाजता यावल येथील खरेदी विक्री संघाच्या आवारात शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. आमदार हरिभाऊ जावळे यांच्याहस्ते काटा पूजन झाले. यावेळी बोलताना आमदार जावळेंनी सरकारने ज्वारीला २४३० रूपये एवढा भाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नोंदणी केलेल्या शेवटच्या शेतकऱ्याचे भरड धान्य खरेदी होईपर्यंत केंद्र सुरू राहिल अशी ग्वाही दिली. तसेच शेतकरी हिताच्या विषयात आपण कधीही राजकारण करत नाही. प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतो, असे सांगीतले.

 

यानंतर भरड धान्य मोजणी शुभारंभात पाच शेेतकरी व मसाकाला थकहमी मिळवून दिल्याने आमदार जावळेंचा सर्वपक्षीयांना छोटेखानी सत्कार झाला. बाजार समितीचे सभापती भानुदास चोपडे, उपसभापती कांचन फालक, तहसीलदार कुंदन हिरे, संचालक भारती चौधरी, शेतकी संघाचे चेअरमन नरेंद्र नारखेडे, व्हॉइस चेअरमन यशवंत तळेले, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा तालुकाध्यक्ष प्रभाकर साेनवणे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, शिवसेना उप जिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, माजी सभापती नितीन चौधरी, निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष विलास चौधरी, कृषिभूषण नारायण चौधरी, कोरपावली विकासोचे चेअरमन राकेश फेगडे, नगरसेवक दीपक बेहेडे, विलास चौधरी, अमोल भिरूड, तेजस पाटील, सेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणेे, उमेश फेगडे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. 

 

कार्यक्रमात बोलताना आमदार हरिभाऊ जावळे यांनी, सरकार कुणाचेही असो शेतकरी हितासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र आलेे पाहिजे. आज भाजपचे सरकार आहे. उद्या काँग्रेसचे, तर परवा पुन्हा भाजपचे येईल, अशी शाब्दिक कोटी केली. मध्येच थोडेसे थांबून हे केवळ उदाहरण आहे. उद्या काँग्रेसचे सरकार येईल म्हणजे खरचं येईल असे नाही. तर १०० टक्के पुन्हा भाजपचेच सरकार येईल हे लक्षात घ्या, असे सांगताच हंशा पिकला. 

बातम्या आणखी आहेत...