Home | News | Javed Akhtar gives answer who troll Shabana Azmi on twitter

'गद्दाराची औलाद तुझी काय औकत'; शबाना आझमींना ट्रोल करणाऱ्या युझरला जावेद अख्तर यांचे सडेतोड उत्तर

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 10, 2019, 04:34 PM IST

इंदूर येथील एका भाषणादरम्यानच्या विधानाबाबत शबाना आझमी नेटकऱ्यांकडून ट्रोल

 • Javed Akhtar gives answer who troll Shabana Azmi on twitter

  नवी दिल्ली - अलिकडील काही दिवसांपासून शबाना आझमी आपल्या राष्ट्रविरोधी विधानामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. शबानाने ट्रोलर्संना सडेतोड उत्तर दिले पण ट्रोल करणारे मागे हटले नाही. अशात शबाना आझमीच्या मदतीसाठी जावेद अख्तर यांना पुढे यावे लागले. यानंतर जावेद अख्तर यांनी एका ट्रोलरची चांगली खरडपट्टी काढली.

  शबाना आझमीने 6 जुलै रोजी इंदूर येथे एका सभेत 'जर कोणी सरकारच्या विरोधात टीका केली तर त्याला राष्ट्रविरोधी म्हटले जाते' अशाप्रकारचे विधान केले होते. यानंतर शबाना आझमीच्या विधानावर त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. पण शबाना आझमींनी मागे हटल्या नाहीत आणि त्यांनी ट्रोलर्सना उत्तर देत 'माझ्या एका टीकेवर एवढा गदारोळ? कट्टर लोकांच्या नजरेत मला इतके महत्व असेल हे मला माहीत नव्हते.' असे ट्वीट केले. शबानाच्या या ट्वीटवर एक युझरने तिला भारत सोडण्यास सांगितले.

  युझरने लिहिले की,
  काश्मीरमध्ये दंगा झाला की यांना त्याचे काही वाटत नाही.
  पश्चिम बंगालमध्ये हत्या झाल्या त्याबाबतही यांना काही वाटले नाही.
  दिल्ली मंदिराची तोडफोड करण्यात आली त्यावरही हे गप्प होते.
  पण यांचे नातेवाईक दहशतवादी मेल्यानंतर यांना त्याचे दुःख होते.
  तर तुम्ही भारत सोडून का जात नाहीत.

  जावेद अख्तर यांनी दिले सडेतोड उत्तर

  यावर मात्र शबाना आझमी ऐवजी जावेद अख्तर यांनी उत्तर दिले. त्यांनी ट्वीटचा रिप्लाय देत म्हटले की, जेव्हा आमचे पुर्वज देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडत होते तेव्हा तुझ्यासारख्यांचे पुर्वज इंग्रजांचे तळवे चाटत होते. गद्दाराची औलाद तुझी काय औकात की तू आम्हाला आमचा देश सोडून जाण्यासाठी सांगत आहेस.

  सोशल मीडियावर शबाना आझमीबाबत अनेक फेट फोटोज आणि बातम्या व्हायरल होत असतात आणि दरवेळी त्यांनी ट्रोलर्संना त्याचे उत्तर दिले आहे.

Trending