श्रीलंकेत झालेल्या हल्ल्यामुळे भडकले जावेद अख्तर, म्हणाले - 'आपल्याला या हिट्लरविरुद्ध एकजूट व्हावे लागेल, नाहीतर.....'

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनीही केला या घटनेचा जाहीर निषेध... 

दिव्य मराठी

Apr 25,2019 05:50:00 PM IST

मुंबई : श्रीलंकेमध्ये ईस्टरच्या दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ३५० लोक मृत्युमुखी पडले. त्यामुळे सध्या सर्वत्र दुःखाचे सावट पसरलेले आहे. भारतातही या हल्याचा खूप निषेध केला गेला. बॉलिवूडच्याही अनेक कलाकारांनी या घटनेबद्दल आपला राग व्यक्त केला. अशातच देशातील प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर दहशतवादी संघटना ISIS ने केलेल्या हल्ल्याचवर आपला राग व्यक्त केला आहे.

जावेद आखात यांनी ट्विट करून लिहिले, "ज्याप्रंरे सभ्य समाज हिट्लरविरुद्ध उभा राहिला होता, त्याचप्रकारे आयएस (IS) विरुद्धही सर्वांनी एकत्र होण्याची वेळ आली आहे. हा केवळ दहशतवाद नाही, हे एक युद्ध आहे."

सोशल मीडियावर हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. जावेद अख्तर सोशल मीडिया वर खूप ऍक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर ते नेहमीच सामाजिक मुद्यांविषयी आपले मत बेदरकारपणे मांडतात.

X