आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : 'चांगल्या वातावरणात माझी मुले मोठी झाली आहेत. त्यांना टार्गेट केले जाते तेव्हा वाईट वाटते. त्यावेळी मी त्यांना समजावतो..., अशा लोकांकडे लक्ष देऊ नका, प्रत्येक समाजात असे लोक असतात. जगात चांगले लोकदेखील आहेत.' मुलाच्या वाढदिवसानिमित्त शायर, गीतकार आणि पटकथा लेखक वडील जावेद अख्तर यांनी बाप-लेकाच्या नात्याचे महत्त्व विशद केले आणि त्याच्या बालपणीच्या आठवणीदेखील सांगितल्या...
फरहानची एखादी चांगली आठवण,जी मनात साठविली आहे?
फरहान खूपच चंागला मुलगा आहे. त्याच्या खूप आठवणी मनात साठवून ठेवल्या आहेत. तो जेव्हा ४ ते ५ वर्षाचा होता, तेव्हाचा एक किस्सा मला आठवतो..., मी पलंगावर झोपलाे होतो आणि तो माझ्या जवळ बसून बोलत होता.
मी त्याला विचारले.. मला सांग... मी जेव्हा म्हातारा होईल, तेव्हा कामावर जाणार नाही, तेव्हा माझी काळजी घेशील का ? तो म्हणाला.., हो मी तेव्हा तुमची काळजी घेईल.
मी विचारले काय करशील... तो म्हणाला... मी तुमच्यासाठी सिगरेट घेऊन येईल. ( त्यावेळी मी स्मोकिंग करत होताे)
मी म्हणालो... कुठून आणणार ? तेव्हा फरहान म्हणाला... मी आईकडून पैसे घेईन.मी म्हणालो...तुझ्या आईला तर मीच पैसे देतो, मी पैसे कमावणारचं नाही तर आईकडे कसे पैसे येतील? मग काय करणार ? तो एक सेकंद थांबला आणि माझ्या गळ्यात पडला आणि रडत म्हणाला...बाबा तुम्ही आयुष्यात कधीच म्हातारे होऊ नका ? त्यामुळे आजही तो माझ्याकडून मॉडर्न जमान्यातील 'रॉक ऑन' सारख्या चित्रपटासाठी गाणे लिहून घेतो. मी कधी म्हातारा होऊ नये, असा त्या मागचा उद्देश आहे
आपल्या कुटुंबाची सर्जनशीलतेची परंपरा फरहान पुढे नेईल, हे तुमच्या कधी लक्षात आले ?
खरं तर, आम्ही मुलांना नालायक समजतो, हीच आमच्या कुटुंबाची परंपरा आहे. माझ्या वडिलांना त्यांचे वडील नालायक समजत होते. माझे वडील मला नालायक समजत होते आणि मी फरहानला नालायक समजत होतो.. मला फरहानची आधी खूपच काळजी वाटायची, तो आयुष्यात काही करणार की नाही, असे वाटायचे. मात्र आज पाहा त्याने मला चकित गेले. मला चुकीचेदेखील ठरवले. यावर मला अभिमान आहे आणि आनंदही आहे.
एकदा त्याने मला दोन पानांवर काहीतरी लिहून दाखवले. त्यात वापरलेली लेखनशैली आणि शब्दावली पाहून मी चकित झालो. मग बऱ्याच दिवसानंतर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला.., मला आणि रितेशला मिळून चित्रपट बनवायचा अाहे. त्याची स्क्रिप्ट त्याने मला दिली. ती पटकथा 'दिल चाहता है'ची होती. स्क्रिप्ट वाचल्यावर मला आश्चर्य वाटले. कथा चांगली आहे, पण तू चित्रपट कसा तयार करशील, आधी स्टार्सला बोलावे लागते, असे मी त्याला म्हणालो.
तो म्हणाला... आमिर खानसोबत माझे बाेलणे झाले, तो तयार आहे. मी हैरान झालो, आमिर सारख्या मोठ्या स्टार्सला साइन करणे सोपे काम नाही, या नव्या पोराने इतक्या मोठ्या स्टारला साइन कसे केले, मी हा विचार करत होतो. याविषयी मी माझ्या एका निर्मात्या मित्राला बोललो. तो म्हणाला..आमिर हा चित्रपट करत असेल तर मी फरहानला ८० लाख देतो त्याला म्हणावे हा चित्रपट तू माझ्यासोबत कर. मी जेव्हा फरहानला बोललो तेव्हा त्याने स्पष्ट नकार दिला आणि म्हणाला...कोणी कितीही पैसे दिले तरी मी हा चित्रपट आपला मित्र रितेशसोबतच बनवणार.
मी म्हणालो.. ठीक आहे..तुला जे याेग्य वाटेल तेच कर. मात्र मला काळजी होती, कारण ते दोघेही नवीन होते. चित्रपट कसे बनवतील.. मात्र दोघांनी मिळून चित्रपट बनवला. यात मुलगी जोयाचेदेखील योगदान आहे. ती न्यूयॉर्कमधून फिल्ममेकिंगचा कोर्स करून आली आहे. तिने त्यांना एक मांडणी करून दिली यातच चित्रपट बनवा. त्यामुळेच तो चित्रपट खूपच सिस्टमॅटिकली बनला. यातील संवाद फरहानने लिहिले होते, स्क्रिप्टदेखील त्यानेच लिहिली होती. चित्रपट पूर्ण झाला आणि याचे फायनल प्रिंट पाहिले तेव्हा काही लोक म्हणाले, हा खूपच स्लो आहे, याला फास्ट करा नाही तर चालणार नाही. मी आता त्यांचे नाव घेणार नाही. कारण ते मोठे लोक होते. मी फरहानला सांगितले... काय करणार ? तो म्हणाला... नाही मी असे काहीही करणार नाही... चित्रपट योग्य आहे. नंतर मी रितेशला विचारले, तो म्हणाला.. फरहान म्हणाला तर मी पूर्ण चित्रपट रिजेक्टर करून पुन्हा शूटिंग करेन. पण इतरांचे ऐकणार नाही, मी फक्त फरहानचे ऐकेन. दोघांचा एकमेकांवर विश्वास पाहून आणि त्यांची मैत्री पाहून मी काहीच बोललो नाही. नंतर मी विचार केला.. एकाला मोठा आॅफर मिळाला होता, मात्र त्याने मैत्रीसाठी ती आॅफर सोडली दुसरा मित्राच्या चित्रपटाला स्लो मानायला तयार नाही. दोघांची मैत्री उदाहरण देण्यासारखी आहे. रितेशदेखील माझ्या मुलासारखा आहे.
फरहानचे नाव कुणी ठेवले ?
बघा, त्यावेळी फरहान मुजीफ साहेबसुद्धा होते. ते अलिगढ मुस्लिम विद्यापीठात शिकवत होते. ते खूपच चंागले होते आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. ते एक चांगले संगीतकार होते, सर्वोत्कृष्ट गिटार वाजवत हाेतेे. चित्रकारही होते. त्यांच्या चित्रासाठी रांग लागायची. ते माझे प्रिय मित्र होते पण कमी एअरलाईन्समुळे आम्ही जास्त भेटत नव्हतो. मला जेव्हा मुलगा झाला तेव्हा मला वाटलं की, माझा सर्वात चांगला मित्र ज्याला मी कमी भेटतो, त्याच्या नावावरच मुलाचे नाव ठेवले तर ? तेव्हा माहीत नव्हते, एअरलाइन्सची संख्या इतकी वाढेल की, दर 15 दिवसांनी मित्राची भेट होईल. हे माहीत असते तर त्याचे नाव फरहान ठेवले नसते. मात्र नाव ठेवण्याचा फायदा झाला, ज्याप्रमाणे फरहान मुजीफ साहेब एक मल्टीटॅलेंटेड होते, त्याचप्रमाणे माझा मुलगा फरहानदेखील मल्टीटॅलेंटेड आहे. तो अभिनेता, लेखक, निर्माता, गायकदेखील आहे. चित्रपट शैलीशी संबंधित प्रत्येक गोष्ट तो करतो.
मुले तुमचे मित्र झाले आहेत, हे तुम्हाला कधी कळाले ?
मी सुरुवातीपासूनच मुलांसोबत वडिलांसारखे कधी वागलो नाही. एका मित्रासारखेच मी त्यांच्याशी वागलो. फरहानमध्ये सेन्स ऑफ ह्युमर चंागले आहे, तो जेव्हा सोबत असतो खूप काही सांगत असतो, त्याच्याकडे अफलातून किस्से असतात, जोक्स ऐकवत असतो, त्याच्यासोबत राहताना माणूस हसतच असतो. मीदेखील त्याचा अंदाज पाहून त्यांच्यासोबत बोलत असतो, आमच्या चांगल्या गप्पा रंगतात. तुझ्याकडेच विनोद बुद्धी नव्हे तर माझ्याकडेही आहे, असे त्याला म्हणत आम्ही गप्पा मारत असतो. मला मुलांचे विचार आवडतात, समाजात काय चाललंय हे त्यांना माहीत असते, ते ऐकून चांगले वाटते. मात्र जेव्हा फरहानला टि्वटरवर ट्रोल केले जाते तेव्हा फार वाईट वाटते. कारण या मुलांचे पालनपोषण चांगल्या ठिकाणी झाले आहे, जातीवादापासून ते फार दूर आहेत. त्यांना कधीच असे शिकवले नाही. फरहान जेव्हा ९- १० वर्षाचा होता, तेव्हा क्रिकेट मॅच पाहायचा, तेव्हा टीव्हीवर आधी तिरंगा लावायचा.. आता तिरंगा घेऊन बसायचा.
(जावेद अख्तर यांच्यावर 'ख्बाबों के गांव मे' पुस्तक लिहिणारे लेखक अरविंद मंडलोई यांनी घेतली मुलाखत.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.