आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : अयोध्येच्या वादावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे बॉलिवूडच्या दिग्गजांनी स्वागत केले आहे. इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी मुस्लिम समुदायाला दिल्या गेलेल्या 5 एकर जमिनीवर चॅरिटेबल हॉस्पिटल बनवण्याचे अपील केले आहे. तसेच सलीम खान यांनी शिक्षण संस्थान बनवण्याची अपील केली.
पद्म भूषण जावेद अख्तर यांनी मुस्लिम समुदायाला 5 एकडर जमीन दिली गेल्यानंतर तिथे रुग्णालय बनवण्याची मागणी केली. त्यांनी ट्वीट केले की, 'उत्तम होईल की, जी 5 एकर जमीन मिळाली आहे तिथे सर्व समुदायांसाठी एक मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल बनवले जावे.'
जावेद अख्तर यांनी सुचवलेल्या पर्यायाने दिया मिर्जाने समर्थन केले आहे. दिया म्हणाली की, उत्तम पर्याय आहे सर. त्यासोबतच आपण या पैशांचा वापर निसर्ग उत्तम बनवण्यासाठीही करावा का.
सलमान खानचे वडील आणि लेखक सलीम खान यांनीदेखील 5 एकर जमिनीवर कॉलेज किंवा शाळा बनवण्याबद्दल बोलले आहेत. ते म्हणाले, 'खरे तर सध्या मशिदीची नाही उत्तम शिक्षणाची गरज आहे. 22 कोटी मुस्लिमांना जर चांगले शिक्षण मिळाले तर या देशातील अनेक कमतरता पूर्ण होऊ शकतात.' मुस्लिम समुदायाला अपील करत ते म्हणाले की, आता या निर्णयाबद्दल चर्चा करण्याऐवजी गरजेच्या गोष्टींबद्दल विचार केला पाहिजे. मशिदीऐवजी शाळा उघडण्याबद्दल ते म्हणाले की, 'नमाज तर आम्ही कुठेही वाचू शकतो.. ट्रेनमध्ये, प्लेनमध्ये, जमीनीवर कुठेही. सध्या सर्वात जास्त गरज उत्तम शिक्षणाची आहे.'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.