आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पीएम नरेंद्र मोदी\' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये स्वतःचे नाव पाहून जावेद अख्तर यांना लागला जोरदार झटका, सोशल मीडियावर सांगितले हैराण होण्यामागचे कारण, यूजर्स घेत आहेत मजा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचा ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला. ओमंग कुमारच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या 'पीएम नरेंद्र मोदी' च्या या ट्रेलरला 24 तासातच एक करोडपेक्षाही जास्त लोकांनी पहिले आहे. पण यासोबतच फिल्मवर वादही सुरु झाले आहेत. झाले असे की, विवेक ओबेरॉय स्टारर या फिल्मच्या क्रेडिट लिस्टमध्ये गीतकार जावेद अख्तर यांचे नाव आहे. पण स्वतः जावेद अख्तर हे पाहून हैरान आहेत. 

जावेद अख्तर यांनी क्रेडिट लिस्टचा स्क्रीनशॉट शेयर करून सांगितले हैराण होण्यामागचे कारण...
शुक्रवारी जावेद अख्तर यांनी क्रेडिट लिस्टचा स्क्रीनशॉट शेयर करून ट्वीटमध्ये लिहिले आहे, "फिल्मच्या पोस्टरमध्ये आपले नाव पाहून मी हैरान आहे. मी या फिल्मसाठी कोणतेही गाणे लिहलेले नाही." मात्र, सोशल मीडिया यूजर्स यासाठी त्यांना खूप ट्रोल करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे. "अरे जिथे फिल्म फसवणूक आहे तर त्यात तुम्ही खरे खोटे का शोधत आहेत ?" आणखी एका यूजरने लिहिले, "अहो काका हीलीले असेल, काल रात्रीची उतरेल, तेव्हा आठवेल, कशामुळे मोदीजींवर इतके जळता" एका यूजरने विचारले, "जगात काय फक्त तुम्ही एकटेच जावेद अख्तर आहात का ?" एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे, "जावेद साहेब, भांग पिऊन तुमचे गाणे ऐकत होते पोस्टर बनवताना. "

Am shocked to find my name on the poster of this film. Have not written any songs for it ! pic.twitter.com/tIeg2vMpVG

— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) March 22, 2019

क्रेडिट लिस्टमध्ये आहेत यांचीही नावे... 
फिल्मच्या क्रेडिट लिस्टच्या गीतकारांमध्ये जावेद अख्तर यांच्यासह गीतकार प्रसून जोशी, समीर अभेंद्रकुमार उपाध्याय, सरदारा, पॅरी जी आणि लवराज यांचीही नावे आहेत. याव्यतिरिक्त स्क्रीनप्लेमध्ये अनिरुद्ध चावलासोबत विवेक आनंद ओबेरॉय याचे नाव बघूनही लोक हैराण झाले आहेत. सुरेश ओबेरॉय, आनंद पंडित आणि आचार्य मनीष यांनी प्रोड्यूस केलेली ही फिल्म 5 एप्रिलला रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...