आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावेद जाफरी चित्रपटांपासून राहतात दूर, पण ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमी चर्चेत राहते मुलगी, श्रीदेवीच्या लेकीची बेस्ट फ्रेंड आहे अलाविया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. बॉलिवूडचा कॉमेडियन जावेद जाफरी 55 वर्षांचा झाला आहे. जावेद एक चांगला अॅक्टर आहेच आणि कॉमेडियन आहे. तो एक उत्तम डान्सरही आहे. एक मल्टी-टॅलेंटेड स्टार म्हणून त्याची ओळख आहे. पण गेल्या काही काळापासून जावेद चित्रपटांमध्ये दिसला नाही. पण त्याची लेक अलाविया नेहमीच आपल्या ग्लॅमरस फोटोजमुळे चर्चेत असते. जावेदच्या तीन मुलांमध्ये अलाविया सर्वात मोठी आहे. जावेदची स्टायलिश मुलगी अलावियाचे इंस्टाग्रामवर जवळपास 1 लाख 30 हजार फॉलोअर्स आहेत. 

 

श्रीदेवीची मुलगी जान्हवीची बेस्ट फ्रेंड आहे अलाविया 
जावेद जाफरीच्या तीन मुलांमध्ये अलाविया सर्वात मोठी आहे. मुंबईमध्ये तिचे बालपण गेले आहे. धीरु भाई अंबानी शाळेतून तिने शिक्षण घेतले. सध्या ती न्यूयॉर्कमध्ये आहे. अलाविया ही श्रीदेवीची थोरली मुलगी जान्हवीची बेस्ट फ्रेंड आहे, हे खुप कमी लोकांना माहिती असेल. दोघीही नेहमीच एकत्र फिरताना दिसतात. इंस्टाग्रामवर दोघींचे अनेक एकत्र फोटोज आहेत. अलावियाने श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशीसोबतही अनेक फोटोज शेअर केले आहे. 

 

रणवीर सिंहची बिग फॅन आहे अलाविया 
अलाविया सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिच्या फोटोजच्या माध्यमातून ती डेली अॅक्टिव्हिटीजविषयी आपल्या मित्रांना सांगत असते. अलाविया चित्रपटांमध्ये केव्हा येणार हे माहित नाही, पण ती रणवीर सिंहची मोठी फॅन आहे. रणवीरसोबत अलावियाचे अनेक फोटोजही आहेत. यासोबतच ती हॉलिवूड सिंगर जस्टिन वेबरची फॅन आहे.
 
अशी आहे जावेद जाफरीचे कुटूंब 
4 डिसेंबर, 1963 रोजी यूपीच्या मुरादाबादमध्ये जावेद जाफरी यांचा जन्म झाला. 1985 मध्ये आलेल्या 'मेरी जंग' मधून जावेदने डेब्यू केला होता. जावेदच्या कुटूंबात पत्नी हबीबासोबतच तीन मुलंही आहेत. मोठी मुलगी अलावियानंतर मुलगा मिजान आणि अब्बास आहेत. मिजानने न्यूयॉर्कमधून फिल्म मेकिंगचा कोर्स केला आहे. तो वडिलांप्रमाणे चांगला डान्सर आहे. 

 

भन्साळींच्या भाचीसोबत डेब्यू करु शकतो मिजान 
भन्साली आपली भाची आणि मिजानला एकत्र लॉन्च करणार असे वृत्त काही दिवसांपुर्वी आले होते. तेव्हा भन्साळींचे असिस्टेंट डायरेक्टर मंगेश हडवले या दोघांच्या चित्रपटाचे डायरेक्शन करणार अशा चर्चा होत्या. ही एक लव्ह स्टोरी असणार आहे आणि या कथेवरील काम झाले आहे. भन्साळी यांची बहीण बेला सहगल यांची ही मुलगी आहे. बेला यांनी अनेक चित्रपटांमध्ये एडिटर म्हणून काम केले आहे.

 

बिग बींच्या नातीसोबत स्पॉट झाला होता मिजान 
जुलै 2017 मध्ये मिजान जाफरी अमिताभ बच्चनची नात नव्याविषयी चर्चेत आला होता. तो नव्यासोबत मूव्ही डेटवर गेला होता. या काळात तो फोटोग्राफर्सला पाहून चेहरा लपवताना दिसला होता. फोटोमध्ये त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पण नंतर एका एन्टटेन्मेंट साइटने तो मिजान असल्याचा खुलासा केला होता.

 

 

बातम्या आणखी आहेत...