आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

44 वर्षांनी भारतात पुन्हा अवतरली ही मोटारसायकल, रंग-रूपापासून डिझाइनपर्यंत सगळे बदलले; एवढी आहे तिन्ही मॉडेल्सची किंमत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - क्लासिक लिजेंड्री मोटारसायकल जावाचे भारतात 3 नवे मॉडेल Jawa Standard, Jawa Forty Two आणि Jawa Perak लॉन्च झाले आहेत. यांची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.55 लाख रुपये आहे. लॉन्चिंगसोबत या बाइकची बुकिंगही सुरू झालेली आहे. या बाइक्सना महिंद्रासोबत मिळून लॉन्च करण्यात आले आहे. भारतात सन 1974 मध्ये बंद झालेल्या जावा मोटारसायकलने तब्बल 44 वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. 

 

सर्व मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किमती

> Jawa Standard 1.64 लाख रुपये
> Jawa Forty Two 1.55 लाख रुपये
> Jawa Perak 1.89 लाख रुपये

 

लॉन्चिंगच्या आधी जावाची क्लासिक 300cc मोटारसायकल आणि स्क्रॅम्बलर स्टाइल मोटारसायकल स्पॉट करण्यात आली होती. याचा टीजरही कंपनीने रिलीज केला होता. यात जावाची झलक पाहायला मिळाली, सोबतच याच्या ट्विन एक्जॉस्ट सिस्टिमचा साउंड ऐकायला मिळाला.

 

कंपनीने जावाला आपल्या लिजेंड्री ओल्ड स्कूल लूकमध्येच डिझाइन केले आहे. आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यात ते यशस्वी ठरले आहेत. नवी जावा क्लासिक 300 मोटारसायकल फ्रंट डिस्क ब्रेक आणि ABS यासारख्या लेटेस्ट सेफ्टी फीचर्सनी युक्त आहे.

 

कंपनी लॉन्चिंगच्या आधीच जावा मोटारसायकलच्या नव्या इंजिनची डिटेल ऑफिशियली दिली होती. या मोटारसायकलमध्ये 293cc चे लिक्विड कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे, जे 27BHP ची पॉवर आणि 28Nm चा टॉर्क जनरेट करते. 6 स्पीड गिअरबॉक्स असलेले हे इंजिन खासकरून इटलीत डिझाइन करण्यात आले आहे. यात बाइकचा रेट्रो लूक कायम ठेवण्यात आला आहे. यासोबतच याचा ट्विन एक्झॉस्टचा साउंडसुद्धा जुन्या जावासारखाच आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, जावा मोटारसायकलचे काही फोटोज...

 

 

बातम्या आणखी आहेत...