आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 फेब्रुवारीपर्यंत Jawa मोटरसायकलची डीलरशिप घेण्याची संधी, देशभरात बनलील 100 डीलर्स...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जावा मोटरसायकलने मार्केट मध्ये वापस येऊन धुम उडवली आहे. जावाला बायर्सकडून खुप रिस्पॉन्स मिळत आहे. याला पाहता कंपनीने 15 फेब्रुवारी पर्यंत देशभरात 100 डीलर्स बनवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आत्तापर्यंत 10 डीलरशिप लॉन्च केली आहे आणि इतर शहरात डीलरशिप उघडण्याचे प्रयत्न करत आहे. क्लासिक लेजेंड्स प्रायवेट लिमिटेडचे को-फाउंडर अनुपम थरेजाने सोमवारी सांगितले की, जावा मोटरसायकल आता आपल्या रिटेल एक्सपिरियंसवर फोकस करत आहे आणि 15 फेब्रुवारी 2019 च्या आधी देशभरात 100 पेक्षा जास्त डीलरशिप सुरू करण्याच्या विचारात आहे.

 
काय असेल खासियत? 
थरेजाने आपल्या नेटवर्क स्ट्रॅटजीबद्दल सांगितले की, बुकिंगची डिमांड पाहता आम्ही निर्णय घेतला आहे की सगळ्या डीलरशिपला जावाच्या टेस्ट राइडसाठी चालु ठेवण्यात येईल, त्यामुळे आमच्या बायर्सना जावा मोटरसायकलची खासियत जाणू शकतील. 


बुकिंग चालु राहील
25 डिसेंबरला ऑनलाइन बुकिंग बंद करण्याची माहिती देताना थरेजाने सांगितले सप्टेंबर 2019 पर्यंतची बुकिंग झाली आहे, त्यामुळे ऑनलाइन बुकिंग बंद केली आहे, पण डीलर्स सप्टेंबर 2019 च्या नंतरची बुकिंग करू शकतात. थरेजाने सांगितले की, आम्ही आमच्या बायर्सना अपील करतोत की, सप्टेंबर 2019 नंतरच्या बुकींगसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. 

 

येथे आहे डीलरशिप 
थरेजा यांनी सांगितले की, जावा मोटरसायकलची सध्या 10 डीलरशिप उघडली आहेत यांत दिल्ली मध्ये 5, पुण्यात 2 आणि बेंगळुरूमध्ये 3 डीलरशिप लॉन्च केली आहेत. 


कसे कराल अप्लाय ?
तुम्हालाही जावा मोटरसायकलचे डीलर बनायचे असले तर ऑनलाइन अप्लाय करू शकता. तुम्हाला जावा मोटरसायकलच्या वेबसाइटवर या लिंकवर  https://www.jawamotorcycles.com/dealer/becomeadealer क्लिक करून ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल, त्यानंतर कंपनीचे आधिकारी तुमच्याशी संपर्क करतील.

बातम्या आणखी आहेत...