आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवान चंदू चव्हाण यांनी दिला लष्करी सेवेचा राजीनामा, ४ महिने होते पाकच्या ताब्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- २०१६ मध्ये अजाणतेपणे सीमा ओलांडल्यानंतर पाकिस्तानच्या ताब्यात राहिलेले जवान चंदू चव्हाण यांनी लष्करी सेवेचा राजीनामा दिला आहे. 
 
चंदू म्हणाले की, सातत्याने छळ झाल्याने मी लष्करातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हापासून मी पाकिस्तानातून परतलो आहे, माझा सातत्याने छळ होत आहे. माझ्याकडे संशयाने पाहिले जात आहे. त्यामुळे मी ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चंदू यांच्या निकटवर्ती सूत्रांनी सांगितले की, त्यांनी अहमदनगर येथील आपल्या युनिटच्या कमांडरकडे राजीनामा पाठवला आहे. सीमा ओलांडल्यानंतर चंदू यांना पाकिस्तानच्या रेंजरनी पकडले होते. ते ४ महिने त्यांच्या ताब्यात होते. या काळात त्यांना मारहाण झाली होती. अर्धमेल्या अवस्थेत त्यांना भारताच्या स्वाधीन करण्यात आले होते.
 

बातम्या आणखी आहेत...