आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉस्टेलच्या मुलींनी सांगितले या सुंदर महिलेचे घाणेरडे काम, मुली म्हणाल्या- मॅडम खुप वाईट आहेत, आमचे आयुष्य नरकापेक्षा वाईट केले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जावरा/रतलाम(मध्यप्रदेश)- जावराच्या कुंदन कुटीर बालिका गृहातून मानुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. 24 जानेवारीला बालिका गृहातून पळून गेलेल्या 5 मुलींनी मजिस्ट्रियल चौकशीत सांगितले की, बालिका गृहाच्या संस्थापिका दारून पिऊन त्यांना मारहाण करायची, तर तिचा पती मुलींवर बलात्कार करायचा. मॅडम खुप वाईट आहेत, आमच्या ओरडण्यावरही त्यांना दया येत नव्हती. तिने आमचे आयुष्य नरकाप्रमाणे केले होते. कलेक्टरांनी सांगितले की- या घटनेची माहिती मिळतोच गुरूवारी बालिका गृहची संस्थापिका, माजी अध्यक्ष आणि वर्तमान बाल कल्याण समिती अध्यक्ष डॉ. रचना भारतीय, तिचा पती ओमप्रकाश भारतीय, वर्तमान अध्यक्ष संजय जैन, सचिव दिलीप बरैया यांना अटक केले आहे.

तहसीलदार सीएल टांक यांच्या कडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत अनेक कलम लावण्यात आले आहेत. कलेक्टर रूचिका चौहान यांनी सांगितले की- तपासत समोर आले की, बालिका गृहची पूर्व अध्यक्ष डॉ. भारतीय दारू पिऊन मुलींना मारहाण करत होती तर तिचा पती ओमप्रकाश भारतीय मुलींचे लैंगिक शोषण करत होता. मुलींचे मेडीकड चेकअप केल्यावर एक मुलगी प्रेग्नंट असल्याचे समोर आले. ती छत्तीसगढच्या एका युवकासोबत पळाली होती, ज्याने तिला नंतर सोडून दिले होते. बालिका गृहाला सील करून सगळा रेकॉर्ड जप्त केला आहे. 


हे चार जण आहे आरोपी

- डॉ. रचना भारतीय, संस्थापिका, बाल कल्याण समिती अध्यक्ष आणि माजी नपाध्यक्षाची सुन 
कुंदन कुटीर बालिका गृहची संस्थापिका आहे. मार्च 2018 मध्ये जिल्ह्यामध्ये बाल कल्याण समितीची पहिली महिला अध्यक्ष. सासरा स्व. कुंदनमल भारतीय कांग्रेस नेते, माजी नपाध्यक्ष.


- ओमप्रकाश भारतीय, वरिष्ठ कांग्रेस नेते आणि पूर्व नपाध्यक्षचा मुलगा, व्याजी व्यवहारी करतो. 

लैंगिक शोषणाचा मुख्य आरोपी ओमप्रकाश उर्फ राजू भारतीय रचनाचा पती आहे. वडील कुंदनमल भारतीय वर्ष 1960-65 मध्ये नपाध्यक्ष होते. ओमप्रकाश व्याजी व्यवहारी करतो.


- संदेश जैन, माजी भाजयुमो नगर महामंत्री व भाजपा नेते आहेत, स्टोन क्रेशरचे काम करतो 
कुंदन कुटीरचे अध्यक्ष संदेश जैनला सह आरोपी म्हणून पकडले आहे. संदेश भाजयुमोचे माजी नगर महामंत्री आणि भाजपा नेते आहेत. त्याचा स्टोन क्रेशरचा बिझनेस आहे.

 

- दिलीप बरैया, भाजयुमो नेते, संघाचा सक्रिय कार्यकर्ता आणि ज्वेलरी व्यापारी 
दिलीप बरैया संस्था सचिव आहे. हा आरएसएसचा सक्रिय कार्यकर्ता आहे, तसेच भाजयुमोचा माजी मंडल अध्यक्ष होता. 


बालिका गृहला लावले ताळे
एसडीएम एमएल आर्यच्या रिपोर्टनंतर चारही आरोपींना ताब्यात घेतले असून तहसीलदार स्वाती तिवारी यांनी बालिका गृहला ताळे ठोकले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...