आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Loksabha2019 महाराष्ट्रातील दोन माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव, सोलापूरमध्ये जयसिद्धेश्वर महाराजांनी मारली बाजी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महाराष्ट्रातील दोन माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे. अशोक चव्हाण हे नांदेड लोकसभा मतदारसंघातून, सुशीलकुमार शिंदे सोलापूरातून रिंगणात होते. 


नांदेडमधून अशोक चव्हाणांचा पराभव
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवलेले अशोक चव्हाण यांचा भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पराभव केला. तर सोलापूरमधून काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपचे जयसिद्धेश्वर महाराज यांनी पराभव केला आहे. सोलापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपसोबतच वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर रिंगणात होते. पण, जयसिद्धेश्वर महाराज यांनी बाजी मारली आहे.

 

वंचित बहुजन आघाडीने सोलापुरमध्ये चांगली मते मिळवली, त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंना वंचित बहुजन आघाडीचा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला या दोन्ही मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.