आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणातील सशक्त स्त्री म्हणून ओळखल्या जाणा-या जयाप्रदा आता छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. 'परफेक्ट सास' या अँड टीव्हीच्या मालिकेत त्या सासूच्या भूमिकेत झळकणार आहेत. जयाप्रदा यांचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी आंध्र प्रदेशातील राजमुंदरी येथे झाला. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तेलुगु सिनेमाद्वारे केली होती. मात्र बॉलिवूड सिनेमांमुळे त्यांना खरी ओळख प्राप्त झाली. सिनेमासोबतच राजकारणातदेखील त्यांनी नाव कमावले. जया प्रदा यांनी करिअरमध्ये यशोशिखर गाठले पण वैवाहिक आयुष्य मात्र त्यांचे अपयशी ठरले. त्यांनी तीन मुलांचे वडील असलेले निर्माते श्रीकांत नाहटांसोबत लग्न केले होते. पण आजही त्यांना पत्नीचा दर्जा मिळू शकलेला नाही. विवाहित असूनदेखील त्या आजही एकटया राहतात.
पहिल्या सिनेमासाठी मिळाले होते 10 रुपये मानधन
वयाच्या 14 व्या वर्षी जयाप्रदा यांना आपल्या शाळेतील डान्स प्रोग्राममध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्यांचे नृत्य बघून एक दिग्दर्शक प्रभावित झाले होते. जयाप्रदा यांना 'भूमिकोसम' या तेलुगु सिनेमात त्यांना नृत्य सादर करण्याची ऑफर दिली. मात्र त्यांनी ही ऑफर स्वीकारली नाही. त्यानंतर आईवडिलांच्या म्हणण्यावरुन त्यांनी ही ऑफर स्वीकारली. या सिनेमासाठी जयाप्रदा यांना केवळ 10 रुपये मानधन मिळाले होते. या डान्स नंबरने जया प्रदा प्रसिद्ध झाल्या आणि त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. वयाच्या 17 व्या वर्षीच त्यांची गणना दक्षिणेतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होऊ लागली होती. 1979 मध्ये त्यांनी सरगम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते.
घरी पडली होती आयकर विभागाची धाड..
ऐंशीच्या दशकात जया प्रदा यांची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होऊ लागली होती. प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्माता त्यांना त्यांच्या चित्रपटात घेण्यास इच्छूक असे. त्याकाळात त्यांच्या घरी आयकर विभागाची धाडदेखील पडली होती. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. घरी आयकर विभागाच्या छाप्यानंतर त्यांचा करिअर ग्राफ घसरु लागला. हा तोच काळ होता, जेव्हा निर्माते श्रीकांत नाहटा यांनी त्यांना साथ दिली. याकाळात श्रीकांत यांनी जया प्रदा यांना खूप मदत केली होती.
असे सुरु झाले श्रीकांत नाहटांसोबत अफेअर...
जया प्रदा आणि श्रीकांत नाहटा यांच्यात हळूहळू चांगली मैत्री झाली. हे दोघे एकमेकांच्या जवळ आला. दोघांची लग्न करायची इच्छा होती. पण त्यावेळी श्रीकांत विवाहित आणि तीन मुलांचे वडील होते. पण जयाप्रदा श्रीकांत यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या, त्यामुळे त्यांनी श्रीकांत यांच्या विवाहित असण्याकडे दुर्लक्ष केले. बी टाऊनमध्ये दोघांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती.
केला होता आत्महत्येचा प्रयत्न...
अखेर जया आणि श्रीकांत यांनी लग्नाचा निर्णय घेतला. जयाप्रदासोबत लग्न करण्यापूर्वी श्रीकांत त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोटदेखील दिला नव्हता. जयाप्रदा यांचे हे पहिलेच लग्न आहे. यांच्या लग्नावरुन बराच वाददेखील निर्माण झाला होता. लग्नानंतर जयाप्रदा यांनी बाळाला जन्म दिला नाही. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात मतभेददेखील निर्माण झाले होते. जयाप्रदा यांनी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे म्हटले जाते.
करिअर आले संपुष्टात...
लग्नानंतर जया यांनी सिनेसृष्टीत काम सुरु ठेवले होते. पण विवाहित पुरुषासोबत लग्न केल्यामुळे हळूहळू त्यांना चित्रपट मिळणे बंद झाले आणि त्यांचे करिअर संपुष्टात आले. करिअरसोबतच वैवाहिक आयुष्यातदेखील चढउतार आले. याच कारणामुळे श्रीकांत आणि जया एकत्र राहात नाहीत. कारण ते त्यांच्या पहिल्या पत्नी आणि मुलांसोबत राहतात. अशाप्रकारे जयाप्रदा यांना श्रीकांत यांच्या पत्नीचा दर्जा मिळू शकला नाही.
बहिणीच्या मुलाला घेतले दत्तक...
जयाप्रदा आणि श्रीकांत नाहटा यांना स्वतःचे बाळ नाही. मात्र जया यांनी त्यांच्या बहिणीचा मुलगा सिद्धार्थला दत्तक घेतले. त्या आपल्या दत्तक मुलासोबत राहतात. 1994 मध्ये जया यांनी राजकारणात प्रवेश केला. सध्या त्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये बिझी आहेत. यावर्षी त्यांचे 'किरान', 'केनी' आणि 'सुरवर सुंदरी' हे चित्रपट रिलीज होणार आहेत. तीन वर्षांपूर्वीच जया यांचा मुलगा सिद्धार्थचे लग्न झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.