आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jayalalithaa's Death, Summons To Three Doctors; Investigation On 23rd And 24th Of August

जयललिता मृत्यूचा तपास, तीन डॉक्टरांना समन्स; 23 व 24 ऑगस्ट रोजी होणार चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन आयोगाने शनिवारी एम्सच्या तीन डॉक्टरांना समन्स जारी केले आहे. आयोगाने तीन डॉक्टरांपैकी श्वास उपचार विभागाचे डॉ. जीसी खिलनानी, प्रोफेसर अंजन त्रिखा व नितीश नायक यांना २३ व २४ ऑगस्ट रोजी हजर होण्याचे आदेश दिले आहेत.आयोग या प्रकरणात डॉक्टरांना साक्षीदार म्हणून दोन दिवस चौकशी करेल. या डॉक्टरांनी चेन्नईतील अपोलो रुग्णालयात जयललिता यांचे निदान केले होते.


जयललितांना २२ सप्टेंबरपासून ५ डिसेंबर २०१६ पर्यंत चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर जयललिता यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायमूर्ती ए. अरुमुगस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या प्रकरणी आयोगाने आतापर्यंत ७५ साक्षीदार व ७ याचिकाकर्त्यांची चौकशी केली आहे. आता या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...