आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीर्घकाळ राज्य करणे अशक्य; जनता पर्याय शाेधते : जयंत पाटील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला - 'अाज दीर्घकाळ राज्य करणे शक्य नसून, जनता सातत्याने पर्याय शाेधते. चंचलतेचे मूळ याच प्रक्रियेत अाहे, 'असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अामदार जयंत पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले. त्यानंतर तेथे उपस्थित नेत्यांमध्ये राजकीय वक्तव्याची जुगलबंदीच रंगली. निमित्त हाेते मराठा भूषण माजी अामदार (कै.) डाॅ. कुसुमताई काेरपे स्मृती शिल्प अनावरण साेहळ्याचे. लाेकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर विविध राजकीय पक्षांत मंथन सुरु असतानाच एका व्यासपीठावर भाजप, राष्ट्रवादी व कांॅग्रेसचे दिग्गज नेते एकत्र येत त्यांनी राजकीय वक्तव्य केल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या हाेत्या. अाजकाल काेणीही उमेदवारी मागते, असा टाेला या सोहळ्यात भाजप खा. संजय धाेत्रे यांनी काेणाचेही नाव न घेता लगावला. याच कार्यक्रमात माजी मंत्री, कांॅग्रेसचे नेते बाबासाहेब धाबेकर यांनी मात्र सध्याचे राजकारण लक्षात घेता शहाण्याने लांबच राहावे, असा सल्ला दिला. माेबाईलमुळे विचारांची अादान-प्रदान हाेते. मात्र प्रत्येक विचाराचा िवचार हाेत नसून, अति उपलब्धतेने चंचलता वाढली, असे अामदार पाटील म्हणाले. िवचार करण्याची पद्धत बदलली असून, काळाच्या अाेघात िनवडणुकांच्या पद्धतीत बदल झाला अाहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असून, त्या अन्यायाला वाचा फुटण्यासाठी पुढाकार घेताहेत. त्या बाेलण्यासाठी, कार्यासाठी धाडस करीत अाहेत, असेही पाटील म्हणाले. 

 

अनेकांिवराेधात लढलाे; वैर निर्माण झाले नाही : बाबासाहेब धाबेकर 
मी अनेक नेत्यांिवराेधात निवडणुकांत लढलाे; मात्र काेणाशी वैर निर्माण झाले नाही, असे मत माजी मंत्री, कांॅग्रेसचे नेते बाबासाहेब धाबेकर यांनी व्यक्त केले. सध्या काळात राजकारणात राहणे कठीण झाले अाहे. शहाण्या माणसाने तर यात न पडलेलेच बरे, असा सल्लाही यांनी दिला. 

 

राष्ट्रवादी-भाजप युतीचे दर्शन; भारिप-बमसंचा पलटवार 
एका कार्यक्रमा निमित्ताने जनतेला भाजप व राष्ट्रवादीच्या युतीचे दर्शन घडल्याचा टाेला भारिप-बमसंने लगावला. राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी उपस्थित असलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भाजपचे खासदार संजय धोत्रे भूषवतात. उदघाटक म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील उपस्थित हाेते. भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. आंबेडकर राष्ट्रवादीशी आघाडी नकाे, अशी भूमिका का घेत आहेत , याचे उत्तर जनतेने २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीची आकडेवारी नजर टाकल्यास दिसून येईल. आजही येथील एका कार्यक्रमात भाजप व राष्ट्रवादीच्या युतीचे दर्शन घडवले, अशी टीका भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, ज्ञानेश्वर सुलताने, डॉ धैर्यवर्धन पुंडकर यांनी केल्याचे डॉ प्रसन्नजीत गवईंनी कळवले. 

 

काेणीही उमेदवारांसाठी दावा करतो : खा. धाेत्रे 
राजकीय पक्षांनी निवडणुकीत उमेदवार उभा करताना ताे सामाजिक बांधिलकी जपणारा अाहे कि नाही, याचा िवचार करावा, असे मत भाजपचे खा. संजय धाेत्रे यांनी वक्त केले. अाता तर काेणीही उमेदवारीसाठी दावा करते, असेही खासदार संजय धाेत्रे यांनी काेणाचेही नाव न घेता टाेला लगावला. 

बातम्या आणखी आहेत...