आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मीनाक्षीचा टिफीन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जयश्री देशमुख मम्मी म्हणजेच मीनाक्षी व संध्या आमचं त्रिकूट. जे काय शिजणार ते तिघींमध्येच. नोकरीनिमित्ताने मी नागपूरला ट्रेनने अपडाऊन करायची, तर या दोघी शहरातच राहणाऱ्या. पावणेआठची ट्रेन असल्याने साडेसातलाच घरून निघायचे. तेही आईच्या हातचे जेवण करून व टिफीन घेऊनच. आॅफिस साडेनऊचे असल्याने रेल्वे स्टेशनवरून धावत आॅफिस गाठायचे, परंतु तोपर्यंत सकाळी घरी जेवलेले पोटात दबून जायचे. भूक लागायची. बाहेरचे खायची सवय नव्हती. संध्या कधी तिने बनवलेले डोसा, उत्तपा, इडली सांभार, ढोकळा घेऊन यायची. मग माझा मोर्चा वळायचा मिमीच्या टिफीनकडे. तीही बहिणीकडे राहत होती. तिच्या बॅगेतील टिफीनमधील पोळ्या, भाजीवर ताव मारून मी कोटा फुल्ल करायचे. ही ओरडायची, परंतु तिची फिकीर करणार कोण? कालांतराने मीनाक्षीने हॉस्टेल जॉइन केले. मेसचा टिफीन. पोळ्या, भात, बाकीचं विचारायलाच नको. मग तिच्या टिफीनवर ताव मारताना विचार करावा लागत होता, परंतु हा विचारही कमी दिवस केला. कारण तिच्या टिफीनमधला एक घास जरी पोटात गेला नाही, तर काही चुकल्यासारखे वाटायचे. ती बिचारी ओरडायची, मी दोन पोळ्या गटकावूनच श्वास घ्यायचे. संध्या ओरडायची माझ्यावर, पण तेही तात्पुरतच. कारण मीनाक्षी तिला मध्येच थांबवायची. म्हणायची, अरे संध्या, खाने दो उसको. कितना खाएगी? आमचं त्रिकूट जमलं की तिची मुलगी, उन्नती माझ्याजवळ येऊन विचारते, मासी, आप मेरी मम्मी का टिफीन क्यूँ खाती थी? वो भूखी नहीं रहती थी? आजही ते दिवस आठवले की हसू येते. कारण माझ्याजवळ मीनाक्षी किंवा तिचा टिफीन नाही की आेरडा करायला संध्या नाही. आहेत फक्त आठवणी.