आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात जयसिद्धेश्वरांचा जयघोष; सुशीलकुमार शिंदेंचे दुसऱ्यांदा 'पॅकअप’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - लिंगायत समाजाचे वर्चस्व तसेच सोलापूरकर जनतेचे मोदींवरचे प्रेम यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही दिसून आले. तसेच काँग्रेसच्या हक्काच्या समजल्या जाणाऱ्या मतांना बहुजन वंचित बहुजन आघाडीने खिंडार पाडले. यामुळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सलग दुसऱ्यांदा पराभवास सामोरे जावे लागले. या पराभवामुळे त्यांचे राजकीय पटलावरून जवळपास “पॅकअप’ झाल्याचे चित्र आहे. कारण त्यांनी स्वत:च ही शेवटची निवडणूक असल्याचे घोषित केलेले आहे. दरम्यान, मागच्या वेळच्या तुलनेत भाजपला अधिक मताधिक्य मिळवून देत डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी प्रथमच थेट संसदेत पाऊल ठेवले आहे. 


सोलापुरात मागील निवडणुकांत मोदी आणि भाजपची लाट होती, अशी चर्चा होती. पण यंदाही मतदारांनी भाजपच्या उमेदवारालाच भरभरून कौल दिला. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. शिवाय त्यांची बदनामी करणारी अनेक कटकारस्थानेही रचली गेली. पण या वेळच्या निकालाने चित्र स्पष्ट केले. लिंगायत समाजाचे एकीकरण आणि पंतप्रधान मोदी यांच्यावरील प्रेम यंदा दिसून आले. एकेकाळी सत्तेत वरच्या स्थानी असलेले शिंदे यांनीही तशी चुरशीची लढत दिली. पण स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्तच हाक देत असल्याने आम्ही त्यांच्यासोबत जाऊ, असा पवित्रा दलित नेत्यांनी घेत बहुजन वंचित आघाडीला पाठिंबा देत प्रवेश केला. याचा जोरदार फटका काँग्रेसला बसला. मुस्लिम मतदारही वंचित आणि काँग्रेस या कात्रीने विभागले गेले. काँग्रेस आणि शिंदेंवर प्रेम करणारे मुस्लिम समाजाचे विभाजन शिंदेंना घातक ठरले. तरीसुद्धा त्यांनी साडेतीन लाख मतांपर्यंत मजल मारली. दरम्यान, या  शिंदे व आंबेडकर वगळता अन्य सर्व जणांची अनामत रक्कम जप्त झाली.

 

विजयचा मागील विक्रम मोडीत
२०१४ च्या निवडणुकीतील उमेदवार अॅड. शरद बनसोडे यांनी १ लाख ४६ हजार ९७४ मतांनी शिंदे यांचा पराभव केला होता, परंतु यंदा ही आकडेवारी मोडीत काढत डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी दीड लाखांवर मताधिक्य घेतले आहे. मतदानादिवशी उजनीचे पाणी हिळ्ळीपर्यंत न सोडल्यास मतदानावर बहिष्कार घालू हे अस्त्र कुडल, तळवळ, गुड्डेवाडी व खानापूरसह २२ गावांनी उचलले होते. परंतु ऐनवेळी केवळ चारच गावांनी पवित्रा कायम ठेवल्याने स्वामींची मतांची घटली नाही. त्यांना हा विक्रम नोंदवता आला.


सोलापूरच्या जनतेसाठी यापुढहीे काम करणार : शिंदे 
विजयी उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे अभिनंदन. मतदारसंघातील सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. त्यांनी मला चांगले मतदान केले, त्यांचा मी ऋणी आहे. लोक न्यायालयाचा हा निर्णय मान्य असून यापुढेही सोलापूरच्या जनतेसाठी कार्य करीत राहणार आहे. आतापर्यंत मला जी सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. यापुढेही काँग्रेसचे काम करीतच राहीन, असे   सुशीलकुमार शिंदे म्हणाले.