आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६५ विकेट घेऊन जयदेव उनादकट ठरला एका सत्रात सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • सौराष्ट्र गुजरातला ९२ धावांनी हरवत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये

राजकोट- सौराष्ट्रने सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफीमध्ये प्रवेश केला. संघाने उपांत्य फेरीत गुजरातला ९२ धावांनी हरवले. डावखुरा वेगवान गोलंदाज व सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनादकटने दुसऱ्या डावात ७ विकेट घेतल्या. एका सत्रात सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज बनला. यापूर्वी १९९८-९९ मध्ये डोडा गणेशने ६२ विकेट घेतल्या होत्या.


सामन्याच्या पाचव्या व अखेरच्या दिवशी गुजरातने दुसऱ्या डावात एक बाद ७ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. कर्णधार पार्थिव पटेल (९३) व चिराग गांधीने (९६) सहाव्या गड्यासाठी १५८ धावांची भागीदारी करत धावसंख्या २२१ पर्यंत नेली. संघाने अखेरचे पाच गडी १३ धावांत गमावले. सौराष्ट्रने पहिल्या डावात ३०४ आणि दुसऱ्या डावात २७४ धावा काढल्या. गुजरात पहिल्या डावात २५२ धावा करू शकला. आता सौराष्ट्रचा ९ मार्च रोजी बंगालशी सामना होईल. 

बातम्या आणखी आहेत...