आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जद (यू) नेत्याच्या लंडनमध्ये शिकलेल्या उच्चशिक्षित मुलीने बिहारमध्ये लॉन्च केली प्ल्यूरल्स पार्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटना : बिहारमधील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीने सामान्य लोकांनाच नाही तर राजकीय विश्लेषकांनाही आश्चर्यचकित करून सोडले आहे. वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर इंग्रजीत छापलेल्या एका जाहिरातीत एक मुलगी पुस्तकांच्या कपाटापुढे उभी आहे आणि तिच्या बाजुला लिहिलेले आहे, ‘सीएम कँडिडेट-बिहार २०२०. त्यानंतर लगेच पुढच्या पानावर या भावी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराने सामान्य बिहारी नागरिकांसाठी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, या चिठ्ठीला सांभाळून ठेवा. कारण आपल्या आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची यात शाश्वती आहे.

त्याचबरोबर हा ही दावा करण्यात आला आहे की, २०३० पर्यंत बिहार युरोपसारखा होऊन जाईल. पत्रांमध्ये बिहारचा इतिहास लिहिण्याबरोबरच हेसुद्धा म्हटले आहे की, ही चिठ्ठी माझे शपथपत्र म्हणून सांभाळून ठेवा. उमेदवारीची इच्छा प्रदर्शित करणारी ही मुलगी आहे पुष्पम प्रिया चौधरी. तिने आपल्या पक्षाचे नाव ठेवले आहे प्लूरल्स.

निवडणुकीपूर्वी ठोकताळ्यांचा बाजार गरम

तिने एका ट्विटमध्ये लिहिले आहे, कि बिहारला बदलण्याची गरज आहे आणि प्ल्यूरल्सजवळ त्याच्यासाठी २०२५ आणि २०३० चा रोड मॅप आहे. एका दुसऱ्या ट्विटमध्ये तिने बिहारच्या जनतेला आपल्या पक्षासोबत येण्याचे आवाहन केले आहे. पुष्पम प्रिया लंडनमध्ये शिकली असून माजी आमदार विनोद चौधरी यांची ती मुलगी आहे असे बोलले जात आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी जनता दल (यू) अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार राजगचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहेत. विरोधी महाआघाडीकडून राजद नेता तेजस्वी यादव यांनी दावेदारी केली आहे. यामध्ये पुष्पम हिच्या एन्ट्रीमुळे ठोकताळ्यांचा बाजार गरम झाला आहे. पुष्पमच्या ट्विटर हँडलनुसार तिने लंडनमधील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये एम ए केले आहे. तसेच युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्मसधूनसुद्धा तिने डेव्हलपमेंट स्टडीजमध्ये एमए केले आहे. आता आपल्या देशात परतून राज्याला बदलण्याची तिची इच्छा आहे.

बातम्या आणखी आहेत...