आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • JDS Chief Chandrababu Naidu Prefers Rahul Gandhi As PM, Discussions After Poll Results

लोकसभा निवडणूकः पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींना जेडीएस पाठिंबा, निकालानंतर यावर चर्चा होणार -चंद्रबाबू नायडू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरू - लोकसभा निवडणुकीच्या निकालांना अवघे काही तास शिल्लक असताना पंतप्रधान पदासाठीच्या चर्चांना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्वच राजकीय पक्ष आपली राजकीय समिकरणे जोडण्याच्या तयारीत आहेत. अशात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली. तसेच मंगळवारी माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे (धर्मनिरपेक्ष जनता दल) नेते एचडी देवेगौडा यांची भेट घेतली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी देखील उपस्थित होते. तेलुगू देसम पक्षाचे नेते नायडू यांनी दोन्ही नेत्यांशी चर्चा केल्यानंतर राहुल गांधींना पंतप्रधान करण्यास अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला. जेडीएसचे नेते देखील यास प्राधान्य देत आहेत असे ते म्हणाले आहेत.


या भेटीनंतर एचडी देवेगौडा म्हणाले, अद्याप निकाल हाती लागलेले नाहीत. त्यामुळे, आम्ही आघाडीवर चर्चा करत नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी त्यांनी राहुल गांधींना पंतप्रधान करण्यास समर्थन दिले होते. राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास अनुभवामुळे मी त्यांच्या शेजारी बसणे पसंत करेन असे ते म्हणाले होते. तत्पूर्वी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर नायडू म्हणाले होते, की सर्वांनाच निकालांसाठी राजकीयदृष्ट्या तयार राहायला हवे. भाजप बहुमतापासून दूर असल्यास सत्ता स्थापनेसाठी मजबूत दावा करण्याची तयारी करायला हवी.

2014 लोकसभा लोकसभा निवडणुकीत कुणाला किती जागा?

राजकीय पक्षजागा
भाजप282
काँग्रेस44
तृणमूल काँग्रेस34
बीजू जनता दल20
तेलुगू देसम पार्टी16
राष्ट्रवादी काँग्रेस6

समाजवादी पार्टी

5
आम आदमी पार्टी4
बहुजन समाज पार्टी0