आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईर्षा ठरते मन आणि मेंदूसाठी आेझे, तिच्यापासून मुक्त हाेणेच सर्वाेत्तम

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

एकदा एका महात्म्याने आपल्या शिष्यांना सांगितले की, उद्यापासून प्रवचनासाठी येताना आपल्यासमवेत पिशवीत माेठ्या आकाराच्या बटाट्याएवढा गाेटा (दगड) साेबत घेऊन या. प्रत्येक दगडावर त्या व्यक्तीचे नाव लिहा, ज्याविषयी तुम्हाला ईर्षा वाटते. ज्याला जेवढ्या व्यक्तींविषयी ईर्षा किंवा द्वेष वाटत असेल, तितके गाेटे त्याने साेबत आणावेत. दुसऱ्या दिवशी सगळे जण साेबत गाेटे घेऊन आले. कुणाकडे चार गाेटे हाेते, तर कुणाकडे ६-८ आणि प्रत्येक गाेट्यावर त्या व्यक्तीचे नाव लिहिलेले हाेते, ज्याचा ते द्वेष करीत हाेते. आता महात्म्याने सांगितले की, येत्या सात दिवसांपर्यंत हे गाेटे नेहमी साेबत बाळगा. जेथे जाल, खानपान कराल, झाेपताना किंवा जागे असाल तेव्हा हे गाेटे साेबत असलेच पाहिजेत. शिष्यांना काही उमगले नाही, की महात्म्याला काय अपेक्षित आहे. परंतु त्यांनी महात्म्याच्या आदेशाचे पूर्णपणे पालन केले. दाेन-तीन दिवसांनंतर शिष्यांनी आपसात एक-दुसऱ्यांशी तक्रार करणे सुरू केले. ज्यांच्याकडे अधिक गाेटे हाेते, त्यांना अधिक त्रास हाेत हाेता. शिष्यांनी कसेबसे सात दिवस घालवले आणि महात्म्याकडे पाेहाेचले. महात्मा म्हणाले, आता आपल्याजवळील गाेट्यांच्या पिशव्या बाजूला ठेवा. शिष्यांनी सुटकेचा नि:श्वास साेडला. महात्म्याने विचारले, गेल्या सात दिवसांचा अनुभव कसा राहिला? शिष्यांनी महात्म्याकडे आपबीती एेकवली आणि झालेल्या त्रासाचा तपशील एेकवला. गाेटे साेबत बाळगल्यामुळे दरराेज निर्माण हाेत राहिलेल्या अडचणींचा पाढा त्यांनी वाचला. या गाेट्यांचे आेझे कायम साेबत राहिल्यामुळे काेणतेही काम व्यवस्थित करता येत नव्हते. सर्वांनी म्हटले, आता भरपूर हलके वाटते आहे. महात्मा म्हणाले, अवघे सात दिवस या गाेट्यांचा सांभाळ करणे तुम्हाला असह्य बनले हाेते, मग विचार करा; तुम्ही ज्या व्यक्तींचा द्वेष करीत हाेता त्याचे किती आेझे मनावर असेल आणि ते आेझे तुम्ही सगळेजण सारे आयुष्यभर सांभाळणार हाेता. विचार करा- आपल्या मनाची आणि मेंदूची या द्वेषपूर्ण विचारांमुळे काय स्थिती हाेत असेल? ही ईर्षा, हा द्वेष तुमच्या मनावर अनावश्यक दडपण लादत असतो. त्यामुळे आपल्या मनातून द्वेषाची भावना पूर्णपणे काढून टाका.

शिकवण : मन आणि मेंदूतून तत्काळ ईर्षेची भावना काढून टाकली पाहिजे. अन्यथा आपल्या मनावर खूप दडपण येते, आणि ती भावना आपले नुकसानही करते...

बातम्या आणखी आहेत...