आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JEE: व्हिआयपीचा दौर्‍याचा क्लासवर परिणाम होत नाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भास्कर एक्सपर्ट पॅनल

प्रो. पी.के. कालरा,
संचालक, आयआयटी जोधपूर

आयआयटीमध्ये 75 टक्के शहरी आणि 25 टक्के ग्रामीण पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी असतात. यापैकी 30 ते 35 टक्के विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य कमकुवत असते, परंतु दोन वर्षांच्या सामूहिक अभ्यासामुळे ते इंग्रजी भाषेतही निपुण होतात.

वर्षभरात केवळ एकच ऐच्छिक सुटी : आयआयटीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती 90 टक्क्यांपेक्षाही अधिक असते.संस्थेकडून वर्षभरात केवळ एकच दिवस ऐच्छिक सुटी मिळते.

व्हिआयपींच्या दौर्‍यावेळीही वर्ग : व्हिआयपीचा दौरा असेल तरीही त्याचा वर्गावर परिणाम होत नाही. काही दिवसांपूर्वी फारूक अब्दुल्लांचा दौरा झाला, तरीही वर्ग रद्द झाला नाही. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय सेमिनारच्या वेळेसही वर्ग सुरूच असतात.

विद्यार्थ्यांनी लॅब उभारली : कानपूरहून तात्पुरत्या स्वरूपात जोधपूरला आयआयटी शिफ्ट करण्यात आली त्यावेळी प्रयोगशाळेची उभारणी विद्यार्थ्यांनीच केली. 90 विद्यार्थी महिनाभर येथे दिवसरात्र काम करीत होते.

पहिला आंत्रप्रेन्युअर : आयआयटी जोधपूरचा एक प्रेरक किस्सा सांगतो. किस्सा आहे आयआयटी विद्यार्थी आंत्रप्रेन्युअर झाल्याचा. तो होता सीकरच्या छोट्याशा गावचा लालचंद बिसू . तो कोणत्याही कोचिंग विनाच आयआयटीत आला. बी.टेक.पूर्ण केल्यानंतर करीअर गाइडन्सच्या ‘एज्युकेशन ट्री’प्रकल्पावर काम सुरू केले. त्यासाठी आयआयटी 10 लाख रुपये निधी देणार आहे.