आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धारदार शस्त्राने जीपचालकाचा खून; मृतदेह जीपमध्ये सोडून आरोपी पसार, जिल्ह्यात खुनांची मालिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परळी तालुक्यातील घटना खुनाच्या घटनांची बीड जिल्ह्यात शृंखला

परळी- माजलगाव येथे विवाहितेच्या खुनाची घटना ताजी असतानाच परळी तालुक्यात जीप चालकाच्या खुनाचा प्रकार समोर आला आहे.

तालुक्यातील कावळ्याचीवाडी -म्हातारगाव मार्गावर उभ्या असलेल्या जीपमध्ये रक्ताने माखलेल्या अवस्थेत जीप चालकाचा मृतदेह मंगळवार १० डिसेंबर २०१९ रोजी सकाळी आढळुन आला आहे. चालकाच्या मानेवर व डोक्यावर धारधार शस्त्राचे वार असून सदरील प्रकार खुनाचा असल्याचा संशय पोलिसांना आहे. विजय सखाराम यमगर (वय ३० रा.दगडवाडी ता.परळी) असे मृत जीप चालकाचे नाव आहे.


परळी तालुक्यातील कावळ्याचीवाडी -म्हातारगाव मार्गावर सोमवारी रात्रीपासून एक जीप (एमएच-२४ व्ही-५१४८ ) उभी होती. मंगळवारी सकाळी शेतात जाणाऱ्या लोकांनी सदरील जीप कोणाची आहे, हे जाणून घेण्यासाठी जीपमध्ये डोकावून पाहिले असता जीपमध्ये समाेर कोणीच दिसले नाही. मागील बाजूस बघितले असता जीपच्या पाठीमागच्या सिटवर रक्ताने माखलेला मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. ग्रामस्थांनी सदरील माहिती परळी ग्रामीण पोलिसांना दिली. यानंतर पोलीस उपअधीक्षक राहुल धस व परळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जीपचा दरवाजा उघडून पाहिला असता त्यांना आत चालक विजय सखाराम यमगर याचा मृतदेह आढळून आला. जीप चालकाच्या अंगावरील शर्ट रक्ताने माखलेला हाेता. मानेच्या पाठीमागे व डोक्यात धारधार शस्त्राचे वार आढळून आले आहेत. त्यामुळे पोलिसांना सदरील प्रकार खुनाचा असल्याचा संशय आहे. जीप चालकाचा तीक्ष्ण हत्याराने खून करून त्याचा मृतदेह जीपमध्येच ठेवण्यात आला. दरम्यान मंगळवारी दुपारी मृतदेहाची उत्तरीय तपासणी परळी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे.

जिल्ह्यात खुनांची मालिका
 
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून करून मृतदेहाचे दोन तुकडे करून घरातच ठेवले. सोमवारी त्याचा एक भाग जाळण्याचा प्रयत्न केला होता. माजलगावात सोमवारी हा खुनाचा प्रकार समोर आला. ही घटना ताजी असतानाच परळी तालुक्यात जीप चालकाच्या खुनाची दुसरी घटना समोर आल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
 

बातम्या आणखी आहेत...