आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेट लेव्हलची स्वीमर असलेल्या अॅक्ट्रेसने स्वतः दिला 'हा' सीन, 'जीव झाला येडापिसा'मध्ये साकारत आहे मेन लीड  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरील 'जीव झाला येडापिसा' या मालिकेत आता नवीन वळण आले आहे. या मालिकेमध्ये शिवा आणि सिध्दीचे नाते आणि त्यांचा लग्नानंतरचा प्रवास जरा वेगळाच आहे. लग्न झाले तेव्हापासूनच दोघांनाही या लग्न बंधनामधून सुटका हवी आहे. पण, सिद्धी घरातील काही जिवाभावाच्या माणसांकडे बघून अजूनही लष्करेंच्या घरामध्ये रहाते आहे. आता मात्र शिवा – सिद्धीच्या नात्याला निर्णायक वळण मिळणार आहे. रुद्रायत या गावामध्ये लवकरच सुरमारीची स्पर्धा रंगणार आहे. सुरुमारीच्या स्पर्धेत विहीरीमधून नारळ बाहेर काढण्याची पद्धत आहे. जी व्यक्ती नारळ काढणार त्या व्यक्तीची सत्ता गावामध्ये राहते अशी परंपरा आहे. पण या स्पर्धेत सहभागी झालेल्या शिवावर जीवघेणा हल्ला होणार आहे. हे सिद्धीला कळताच ती शिवाचा जीव वाचविण्यासाठी विहीरीत उडी घेणार आहे.  

'जीव झाला येडापिसा' मालिकेचे चित्रीकरण रिअल लोकेशन्सवर होते. सुरमारीच्या या दृश्यासाठी मालिकेच्या संपूर्ण टीमने खूप मेहेनत घेतली आहे. सुरमारी या खास स्पर्धेचे शूट तब्बल 3 दिवस सुरू होते.  मालिकेत अभिनेत्री विदुला चौघुले सिद्धीची भूमिका साकारत आहे. सुरमारीच्या स्पर्धेच्या सीनसाठी स्वतः विदुला चौघुले हिने अंडरवॉटर शॉट दिला आहे.  यासाठी तिने खास तयारी आणि सरावदेखील केला. या अनुभवाबद्दल बोलताना सिध्दी म्हणजेच विदुला चौघुले म्हणाली, “जेव्हा आम्हाला ही कथा सांगितली तेव्हा सिद्धीदेखील पाण्यामध्ये उडी मारणार याची कल्पना मला देण्यात आली होती. मी स्वत: स्टेट लेव्हलची स्वीमर आहे, त्यामुळे पाणी दिसले पाण्यामध्ये उडी मारण्याची आतून इच्छा होते. जेव्हा अशोक सुरमरीच्या स्पर्धेची तयारी करत होता, त्याचे पाण्यामध्ये उडी मारण्याचे शॉट असायचे तेव्हा मी देखील माझ्या शॉटची वाट बघत होते. खरं तर सुरमरीच्या स्पर्धेची चर्चा सुरू झाली तेव्हा माझ्याजागी डमी उभा करायचा अशी चर्चा सुरू होती. पण मीच सांगितले की मी हे करू शकते. आम्ही या सुरमारीच्या स्पर्धेचे अन्डरवॉटर शूट केलं. खूप मज्जा आली इतके नक्की आम्हाला खात्री आहे प्रेक्षकांनादेखील नक्की आवडेल”.

बातम्या आणखी आहेत...