आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : 'जीव झाला येडापिसा' मालिकेमध्ये गौरवच्या परत येण्याने सिद्धी आणि शिवामध्ये दुरावा आला, भांडण झाली. दोघांमध्ये बरेच गैरसमज देखील झाले पण, प्रेमात खूप ताकद असते ते अगदी खरे आहे. याच प्रेमामुळे गौरवचं सत्य शिवासमोर आला आणि आता लवकरच शिवा गौरवचा खरा चेहरा सिध्दीसमोर आणणार आहे. शिवाला हे सत्य कसे कळाले? तो सिध्दीसमोर ते कसे आणणार? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.
शिवाने सिद्धीसमोर गौरवचे पितळ उघडे करताच आणि त्याचा अशा वागण्यामागचा हेतू कळताच सिध्दीला राग अनावर झाला आणि ती गौरवच्या सणसणीत कानाखाली मारते. सिद्धी गौरवला त्यांच्या आयुष्यातून निघून जाण्यास सांगते इतकेच नसून तुझ्यावर प्रेम केले याची मला लाज वाटते, माझ्या मनामध्ये फक्त शिवा आहे आणि शेवटपर्यंत तोच राहील असे देखील त्याला बाजावून सांगते.
सिद्धीचे मन शिवाने कधीच जिंकले आहे, आणि तिचे त्याच्यावर प्रेमदेखील आहे याची कबुली तिने दिली आहे. पण सगळ्या घडल्या प्रकारामुळे कुठेतरी शिवाला याची जाणीव होऊ लागली आहे की, त्याला देखील सिद्धी आवडू लागली आहे, पण आता शिवादादा सिद्धीवर प्रेम करू लागला आहे हे तो तिला कशाप्रकारे सांगेल ? सिद्धीचे त्यावर काय उत्तर असेल ? आपल्या शिवादादा आणि सिद्धीमध्ये लवकरच फुलणार प्रेम हे तर नक्की.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.