आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडाणीपणा नडला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकदा दोघा मित्रांनी कडाक्याच्या भांडणात एकमेकांचे डोके फोडले. प्रकरण न्यायाधीशांपर्यंत गेले. न्यायाधीशांनी त्यांना भांडणाचे कारण विचारले. पहिला म्हणाला, मी याला म्हैस खरेदी करण्यास विरोध केला, तर दुसरा म्हणाला, मी याला शेतखरेदीस विरोध केला. पहिल्याने सांगितले, याने म्हैस खरेदी केली असती, ती माझ्या शेतात घुसून पीक खाल्ले असते. त्यामुळे माझे नुकसान झाले असते. दुसरा म्हणाला, त्यासाठीच मी त्याला शेत घेऊ नको असे सांगत होतो, कारण म्हशीला दरवेळी आवरण्यास मी सतत तिच्याजवळ थांबू शकत नव्हतो. त्याने माझ्या मित्राचेच नुकसान झाले असते. न्यायाधीशांनी विचारले, तुझे शेत कोठे आहे? आणि तुझी म्हैस कोठे आहे? दोघेही म्हणाले,हुजूर! तेच तर आम्ही खरेदी करणार आहोत. न्यायाधीश म्हणाले, मूर्खपणा सोडा, अजून कशाचाच पत्ता नाही आणि तुम्ही दोघेही आवेशात येऊन भांडणे करत आहात.