आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jeff Bezos Lauren Sanchez Photo Leaked Case Latest News And Updates:Amazon CEO Girlfriend Brother Michael Sanchez Filed A Defamation Case Against Bezos

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांच्या गर्लफ्रेंडच्या भावाने बेजोसवर दाखल केला मानहानीचा खटला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेजोस आणि लॉरेनचे खासगी फोटो लीक केल्याचा आरोप

सॅन फ्रान्सिस्को - अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेजचा भाऊ मायकल सांचेजने बेजोस यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. मायकलने लॉरेन आणि बेजोस यांचे खासगी फोटो लीक केल्याचा आरोप जेफ बेजोस यांनी केला होता. मायकलने हे आरोप फेटाळून लावले आहेत. या आरोपांमुळे माझी बदनामी झाल्याचे मायकलचे म्हणणे आहे. या आरोपामुळे माझ्या घरावर एफबीआयने छापा मारला, यामुळे शेजाऱ्यांच्या मनात माझी प्रतिमा मलिन झाल्याचे मायकलने म्हटले आहे. अमेरिकी मॅगझीन नॅशनल एनक्वायररने गेल्या वर्षी जानेवारीत बेजोस आणि लॉरेन यांचे फोटोंसोबत त्यांच्या अफेयरचा खुलासा केला होता.

मायकलला लीकच्या बदल्यात 1.5 कोटी रुपये मिळाले- रिपोर्ट

मायकलने सांगितले की, जेव्हा बेजोस आणि लॉरेनचे फोटो लीक झाले, तेव्हा तो एक जबाबदार भाऊ आणि मॅनेजरची भूमिका पार पाडत होते. लीक प्रकरणात त्याचा काहीच संबंध नव्हता. मागच्या आठवड्यात अमेरिकी वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने ही रिपोर्ट दिली होती की, मायकलला नॅशनल एनक्वायररकडून 2 लाख डॉलर मिळाले होते. सरकारी वकीलांकडू या गोष्टीचे पुरावे आहे की, लॉरेननेच आपल्या भावाला हे फोटो दिले. त्यानंतर मायकलने हे फोटो मीडियाला विकले.

बेजोस यांच्या फोन हॅकमध्ये सौदी अरबचा हात असल्याचा संशय
 
दुसरीकडे, लॉरेनने बेजोसविरोधात खटल्यात काहीच तथ्य नसल्याचे म्हटले आहे. बेजोस यांच्या फोटो लीक प्रकरणात दोन आठवड्यांपूर्वीच एक नवीन वळण आले, जेव्हा ब्रिटेनचे वृत्तपत्र द गॉर्जियनने रिपोर्ट दिली की, बेजोस यांचा फोन हॅक करण्यात सौदी अरबचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान यांचा हात असू शकतो. सौदी अरबने या आरोपांचे खंडन केले होते.

बेजोस यांनी नॅशनल एनक्वायररवर ब्लॅकमेल करण्याचे आरोप लावले होते
 
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोसने माजी पत्नी मॅकेंजी यांच्यासोबत मागच्या वर्षी घटस्फोट घेतला होता. नॅशनल एनक्वायररने म्हटले होते की, लॉरेनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे पत्नीने बेजोस यांच्याशी काडीमोड घेतला. त्यानंतर बेजोसने नॅशनल एनक्वायररवर ब्लॅकमेलींचा आरोप लावला होता.